
हिंदुस्थानच्या मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती खालावली आहे. गेल्या 10 वर्षांत मध्यमवर्गींयाचे उत्पन्नच वाढलेले नाहिये. तर दुसरीकडे महागाई वाढली आहे. मार्सेल संस्थेचे संस्थापक सौरभ मुखर्जी यांनी हिंदुस्थानच्या मध्यमवर्गींयाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गेल्या 10 वर्षात वर्षाला 5 लाख ते एक कोटी रुपये कमावणाऱ्यांचे उत्पन्न जैसे थेच आहे. एकीकडे महागाई वाढली असल्याने मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती कमी झाल्याचे मुखर्जी यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे कमी कमाई करणारे आणि श्रीमंतांचे उत्पन्न वाढलंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. यामुळे लोकांच्या आर्थिक चिंता वाढल्या आहेत.
आयकर विभागाच्या आकडेवारीचा हवाला देत मुखर्जी म्हणाले की गेल्या 10 वर्षात मध्यमवर्गीयांचे उत्पन्न वाढलेले नाहिये. पण एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या अतीश्रीमंतांची संख्या सातपटींनी वाढली आहे. हे हिंदुस्थानचे नवीन राजा राणि आहे. हेच लोक देश चालवतात, राजकीय व्यवस्थेच्या आर्थिक गोष्टींना हातभार लावतात आणि लक्झरी बाजार चालवतात असेही मुखर्जी म्हणाले.