
लढाऊ विमान कोसळल्याची घटना गुजरातच्या जामनगर येथे घडली. जग्वार लढाऊ विमान सुवरडा गावातील बाहेरच्या परिसरात कोसळले. विमानाचा पायलट अत्यंत गंभीर अवस्थेत पडला होता आणि विमानाचे तुकडे त्याच्या भोवती पसरले होते. तसेच विमानाला आग लागल्याने जिकडे तिकडे धुर आणि आगीचे लोळ दिसत होते, असे भयंकर चित्र विमान कोसळल्यानंतर होते. पोलिसांना या घटनेबाबत समजताच त्यांनी तत्काळ रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली आणि पायलटला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, गेल्याच महिन्यात हरयाणाच्या पंचकूला येथे तांत्रिक बिघाडामुळे एक जग्वार लढाऊ विमान कोसळले होते.