Mango Juices- उन्हाळ्यात आंब्याचे हे चार ड्रिंक नक्की ट्राय करा

उन्हाळ्यात आंब्याचा रस म्हणजे जणू स्वर्गचं. फळांचा राजा, आंबा हा केवळ चवीचा खजिना नाही तर तो अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत देखील आहे. त्यात पोटॅशियम, प्रथिने, व्हिटॅमिन सी, फायबर, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम, लोह असे अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पिकलेला आंबा तुमची पचनक्रिया सुधारतो. हृदय निरोगी ठेवते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते. आंबा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता पदार्थ आहे. त्यातून अनेक प्रकारचे मिष्टान्न आणि ड्रिंक्स देखील बनवली जातात. जर तुम्हीही आंब्याचे चाहते असाल तर या उन्हाळ्यात घरच्याघरी सोप्या पद्धतीने हे चार ड्रींक बनवून आंब्याचा आनंद घ्या

मँगो शेक बनवा


मँगो शेक बनवण्यासाठी पिकलेल्या आंब्याची साल काढा आणि त्याचा गर एका भांड्यात काढा. ते मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये थोडी साखर आणि दूध घाला. ते सर्व चांगले बारीक करुन घ्या. नंतर त्यामध्ये मँगो शेक थंड राहण्यासाठी थोडा बर्फ घाला आणि पुन्हा मिक्सक मध्ये फिरवून घ्या . नंतर मॅंगो मिल्क शेक एका ग्लासमध्ये घाला आणि त्यात चिरलेले काजू आणि सुके फळे घालून सजवा.

 

आंबा-नारळ मोईतो 


मँगो मोईतो हा अनेकांचा आवडता प्रकार बनवण्यासाठी,आंब्याचे काप मिक्सर मध्ये टाका नंतर त्यामध्ये लिंबाचा रस घाला. थोडे काळे मीठ आणि चिमूटभर काळी मिरी घाला. त्यात नारळ पाणी घाला, बर्फ घाला आणि थंडगार आंबा-नारळ मोजिटोचा आनंद घ्या.

 

मँगो लस्सी


आंब्याच्या लस्सीची चव अप्रतिम आहे. मँगो लस्सी बनवण्यासाठी मिक्सरमध्ये आंब्याचा गर काढा आणि त्यात दही आणि साखर घाला. यानंतर, थोडी वेलची पावडर घाला आणि चिरलेला सुका मेवा घाला आणि बर्फाचे तुकडे घाला किंवा फ्रीजमध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा.

 

 

 

 

आंबा पुदिना ड्रिंक

आंब्याचे छोटे छोटे काप करुन मिक्सरमध्ये पुदिन्याची पाने आणि थोडे मध घालून बारीक करा. आता एका ग्लासमध्ये लिंबाचे तुकडे घाला आणि त्यात काळे मीठ घाला. स्मॅश करा. ग्लासमध्ये बर्फाचा एखादा तुकडा घाला. दोन चमचे किंवा चवीनुसार तयार केलेली प्युरी घाला नंतर सोडा घाला आणि चविष्ट आंबा पुदिना पेय चा आनंद घ्या.