सरकारी योजनेच्या नावाखाली महिलेचे दागिने लांबवले

सरकारकडून महिन्याला सात हजार रुपये मिळणार असून त्यासाठी अर्ज मिळतोय. अर्जासाठी पह्टो काढावा लागेल असे सांगून महिलेचे दागिने काढण्यास तिला भाग पाडले. दागिने घेऊन ठग महिला पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार महिला या वांद्रे येथे राहतात. गेल्या आठवडय़ात त्या काम करून घरी जात होत्या. हिल रोड येथून जात असताना एक महिला त्याच्याजवळ आली. तुम्हाला सरकारकडून महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहेत. त्या योजनेचा अर्ज फक्त अंधेरी येथेच मिळतो अशा तिने भूलथापा मारल्या. त्यानंतर महिलेला रिक्षात बसवून अंधेरी पूर्व परिसरात आणले. तिला एका स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी नेले.

 काढत असताना ती महिला आत आली. अंगावर दागिने असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सोने काढून द्या असे तिने महिलेला सांगितले. ते दागिने आपल्याकडे द्यावे, थोडय़ा वेळाने परत करू, अशा तिने भूलथापा मारल्या. त्यावर विश्वास ठेवून महिलेने दागिने दिले.

z फोटो काढल्यानंतर त्या दोघी बाहेर पडल्या तेव्हा महिलेला थांबवण्यास सांगितले. थोडय़ा वेळात येतो असे सांगून ती महिला निघून गेली. दोन तास वाट पाहिल्यानंतर ती महिला तेथे आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला.