
मुंबईसह राज्यभरात सूर्य आग ओकत असताना मुंबईमध्ये 12 मार्चलाही उकाडा राहणार असल्याचा इशारा मुंबई हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यातच मुंबईत देवनार, मालाड पश्चिम आणि बीकेसीमध्ये एअर क्वॉलिटी इंडेक्सने अडीचशे पार झेप घेतल्याने प्रदूषण वाढल्यामुळे टेन्शन वाढले आहे. मुंबईकरांवर उष्णतेच्या लाटेसह आता प्रदूषणवाढीसह आजारांचे संकट वाढले आहे.
मुंबईत हिवाळय़ात बिघडलेली हवेची गुणवत्ता सुधारत असताना आज पुन्हा एकदा अनेक भागांत प्रदूषण नोंदवले गेले. अचानक वाढलेला उकाडा आणि प्रदूषणामुळे आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ ‘एआयक्यू’ तपासला जातो. यामध्ये 0 ते 50 पर्यंत ‘एक्यूआय’ ‘अतिशय शुद्ध हवा’ मानली जाते.
मुंबईच्या हवेची आजची स्थिती
z देवनार – एक्यूआय 216 – खराब हवा
z मालाड पश्चिम – एक्यूआय 260 – खराब हवा
z वांद्रे–कुर्ला संकुल – एक्यूआय 204 – खराब हवा
z बोरिवली पूर्व एक्यूआय – 200 – खराब हवा
z चेंबूर – एक्यूआय 184 – मध्यम दर्जाची हवा
z भायखळा – एक्यूआय 172 – मध्यम दर्जाची हवा
हवामान खात्याचा ‘अंदाज’
समुद्र किनारी वसलेल्या मुंबईत पूर्वेकडून येणाऱया वेगवान वाऱ्यांनी समुद्री वाऱयांचा वेग रोखल्याने सध्या तापमान वाढीची स्थिती निर्माण झाली आहे. मार्चमध्येदेखील अशाच प्रकारे उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.
आजार बळावले
अचानक वाढलेल्या प्रचंड उकाडय़ामुळे व्हायरल फ्युअरसह इतर आजारांचे प्रमाण पाच ते दहा टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, उन्हापासून स्वतःचा बचाव करावा आणि उष्माघाताचा त्रास झाल्यास तातडीने पालिका रुग्णालयात डॉक्टरांशी संपर्क करावा, असे आवाहन शीव रुग्णालयाचे अधिष्ठात डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.