शिंजो आबेंचा पक्ष 15 वर्षांत पहिल्यांदाच बहुमतापासून दूर

जपानमध्ये या वेळी कुणालाच बहुमत मिळाले नाही. सत्ताधारी एलडीपी अर्थात लिबरल डेमोक्रेटिक पार्टीची आघाडी संसदेत बहुमताचा आकडा गाठू शकली नाही. शिंजो आबे यांच्या एलडीपीला केवळ 191 जागा मिळाल्या. त्यांना 65 जागांवर नुकसान सहन करावे लागले. पक्षाचा हा गेल्या 15 वर्षांतील सर्वात खराब निकाल असल्याचे मानले जात आहे. एलडीपी आणि मित्रपक्ष कोमिटो यांना मिळून एकूण 215 जागांवर विजय मिळवता आला. सरकार चालवण्यासाठी आघाडीला 233 जागांची गरज आहे.

जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी गेल्या महिन्यात पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान झाले होते. निवडणूक निकालानंतर इशिबा यांनी निवडणूक निकाल त्यांच्या पक्षाच्या बाजूने दिसत नाही. जनतेने कठोर निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय नम्रतेने स्वीकारतो, परंतु सध्या आपण आणखी पक्ष जोडण्याचा प्रयत्न करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.