अजब ‘केस’… सोन-चांदी नव्हे तर केसावर, जडला चोरांचा जीव

हरीयाणामध्ये अजब ‘केस’ घडली आहे. एका व्यापाऱ्याच्या घरातून सोने किंवा चांदी नव्हे तर लाखो किंमतीचे केस चोरीला गेले आहेत. सुमारे 150 किलो वजनाचे केस होते. त्यासोबतच 2 लाख 13 हजार रुपयांचीही चोरी झाली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये पैद झाली आहे. रंजित मंडल असे व्यापाऱ्याचे नाव आहे. रंजित मूळचे पश्चिम बंगालचे असून ते हरयाणातील फरिदाबाद येथे राहतात. रंजित हे विग तयार करून विकायचे काम करतात. त्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. चोरीची घटना 14 जानेवारी रोजी मध्यरात्री घडली. चोरांनी घरात प्रवेश केला आणि खोलीचे कुलुप पह्डले. त्यानंतर खोलीतून 150 किलो केस चोरले. त्यांची किंमत सात लाख रुपये आहे.