उडता चंद्रपूर;तीन वर्षांत कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त, एनसीबीची धडक कारवाई

राज्याचे शेवटचे टोक असलेला चंद्रपूर जिल्हा आता उडता चंद्रपूर होते की काय? अशी चर्चा सुरू आहे. अमली पदार्थ विरोधातील मागील वर्ष भरातील स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईचे आकडे पुढे आले आहेत. 2022,2023 या वर्षाचा तुलनेत 2024 वर्षात स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश आल्याचे दिसत आहे. वर्षभरात झालेल्या कार्यवाहीत एकूण 13 लाख 84 हजार 430 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थात ब्राऊन शुगर, M. D. पावडर, गांजा याचा समावेश आहे.

राज्याचा शेवटचा टोकावर असलेला जिल्हा चंद्रपूर. शहरी भागातील श्रीमंतीचे आकर्षक देखावे येथे दिसतील. दुसरीकडे अन्नाचा घासाघासा मोहाताज झालेले असंख्य कुटुंबे. मोडकी पडकी घरे, कुतत कुतत जगणाऱ्या माणसांचे घामेजलेले चेहरे, शरीरावर मळके अन अंग झाकण्यास असमर्थ असलेले फाटके कपडे घालणाऱ्याचे जीवन. विरोधाभास जीवनमान असलेल्या या दोन टोकाचा माणसानी कोटीचे अमली पदार्थ गिळले आहेत. ग्रामीण भागात गांजा सहज उपलब्ध होत असल्याने अल्पवयीन मुले अमली पदार्थांची शिकार होत असल्याने चिंता व्यक्त केली जात असून चंद्रपूरला उडता चंद्रपूर होण्यापासून वाचवा अशी मागणी होत आहे.

काय सांगतेय आकडेवारी..

2022 मध्ये 3374180 लाखांचा गांजा जप्त केला गेला.बारा प्रकरणात 17 आरोपीना पोलिसांनी अटक केली. n 2023 या वर्षभरात 3732495 रुपयाचा गांजा आणि अमली पदार्थ जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं. यामध्ये 165.264 किलो ग्राम गांजा, 174 ग्राम चरस, डोडा पावडर 1.518 कि. ग्राम, MD पावडर 198 ग्रॅम यांचा समावेश आहे.याप्रकरणी 46 आरोपीना अटक करण्यात आली. n 2024 वर्षात 13 लाख 84 हजार 430रुपयाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. यात 125.699.074 कि. ग्रॅ. गांजा जप्त करण्यात आला. 7.12 ब्राऊन शुगर,  M. D. पावडर 22.808 ग्रॅम जप्त करण्यात आला होता. 28 कार्यवाईमध्ये 45 आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले.