तिरुपती मंदिर परिसरात राजकीय तसेच भडकाऊ भाषण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तिरुमला तिरुपती देकस्थानने मंदिराचे पाकित्र्य आणि आध्यात्मिक शांततेचे रक्षण करण्यासाठी द्वेषपूर्ण भाषणांकर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिराला भेट दिल्यानंतर काही राजकीय पुढाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना राजकीय बाबींकर आणि द्वेषपूर्ण भाष्य केले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. स्थानिक रहिकाशांना 3 डिसेंबर रोजी तिरुमला
येथे श्रीकरी दर्शनाची सोय केली जाईल.
बायकोमुळे आठ कोटींची लॉटरी
सिंगापूर येथे वास्तव्यास असलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या एका व्यक्तीस आठ कोटी रुपयांची लॉटरी लागल्याने तोदेखील अवाक् झाला. एक दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास आठ कोटी रुपये जिंकल्याने तो करोडपती झाला. तीन महिन्यांपूर्वी बायकोसाठी सोने खरेदी केल्याने त्याचे नशीब चमकले. हिंदुस्थानी वंशाचे बालासुब्रमण्यम चित्रंबरम यांना ही लॉटरी लागली. ते 21 वर्षांपासून सिंगापुरात अभियंता म्हणून काम करत आहेत. येथे ‘लिटिल इंडिया’ स्टोरच्या वार्षिक कार्यक्रमाचा हिस्सा असलेल्या दागिन्यांच्या दुकानाने एक ड्रॉ काढला. चित्रंबरम यांनी पत्नीसाठी सहा हजार सिंगापूर डॉलर खर्च करून सोन्याची खरेदी केली आणि ते ड्रॉसाठी पात्र ठरले. मग ‘लकी’ ठरताच त्यांना आनंदाश्रू आले.
‘पुष्पा-2’ सापडला सेन्सॉरच्या कात्रीत
अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-2’ चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघे चार दिवस उरले आहेत. परंतु सेन्सॉर बोर्डाने पुष्पाच्या काही सीन्सवर कात्री लावली असून बदल करण्यास सांगितले आहेत. हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला यू/ए सर्टिफिकेट दिले आहे.
सरकारी नोकरदार बनला डिलिक्हरी बॉय
सरकारी नोकरदार असूनही अमित कुमार हा शिक्षक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पार्ट टाइम डिलिक्हरी बॉय म्हणून संघर्ष काम करत आहे. बिहारमधील भागलपूर येथील अमित यांनी आपली आपबीती सांगताना, केकळ आठ हजार रूपये एकढे केतन असल्याचे सांगितले. अडीच कर्षापासून पगाराच्या बाबतीत जैसे थे स्थिती आहे. सरकारने अद्याप शिक्षकांची पात्रता परीक्षा घेतली नाही. शाळेतील अन्य शिक्षकांना 42,000 इतका पगार मिळतो. पण, माझे आणि इतर काही सहकाऱ्यांचे मागील चार महिन्यांचे केतन रखडले असल्याने उदरनिर्काह करण्यासाठी इतर मार्ग शोधाका लागला, असे अमित कुमार सांगतात.
बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
बांगलादेशात हिंसाचारात तीन मंदिरांची तोडफोड करण्यात आली. बांगलादेशातील चट्टोग्राम येथील शांतानेश्वरी मातृमंदिर, शनिमंदिर आणि शांतनेश्वरी कालिबाडी या हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. या ठिकाणी शेकडोच्या जमावाने जोरदार घोषणाबाजी करत दगड आणि विटांचा वर्षाव करत मंदिरांना लक्ष्य केले. हल्लेखोरांनी मंदिराचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मंदिराचे फारसे नुकसान झाले नाही.
प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून एका प्रियकराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे. विवेक गुप्ता असे या तरुणाचे नाव असून तो अवघ्या 23 वर्षांचा आहे. विवेक वडिलांसोबत पान मसाल्याचे दुकान चालवायचा. एका मुलीचा व्हिडीओ कॉल आला होता. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. मुलीने विवेकला नस कापून घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.
अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या
अमेरिकेतील शिकागो शहरात हिंदुस्थानातील विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नुकरपू साई तेजा (26) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तेलंगणातील खम्मम जिह्यातील आहे. पदवीचे शिक्षण घेण्यासाठी चार महिन्यांपूर्वीच तो अमेरिकेत आला होता. परंतु गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
शाहीदचा ‘देवा’ चित्रपट 31 जानेवारीला येतोय
अभिनेता शाहीद कपूरचा आगामी चित्रपट ‘देवा’ 31 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दोन आठवडे आधीच प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.
इटली आणि हिंदुस्थानच्या व्हाईस ऍडमिरल यांची भेट
इटलीच्या नौदलाचे सर्वोच्च अधिकारी व्हाईस ऍडमिरल अटोनियो नटाले यांनी हिंदुस्थानच्या नौदलाचे पश्चिम कमांडचे प्रमुख व्हाईस ऍडमिरल संजय सिंग यांची भेट घेतली. यावेळी या दोन बडया अधिकाऱ्यांमध्ये सागरी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या मुद्दय़ावर सविस्तर चर्चा झाली.
बेल्जियममध्ये वेश्यांना मिळणार नोकरदारांप्रमाणे सुविधा
वेश्या व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना नोकरदाराप्रमाणे सुविधा मिळणार आहेत. यासाठी बेल्जियमने एक नवा कायदा बनवला आहे. या कायद्यानुसार, सेक्स वर्कर्सदेखील एका कराराखाली काम करतील. त्यांना आरोग्य विमा, पेन्शन, आजारी असल्यास रजा आणि प्रसूती रजा अशा काही सुविधा मिळतील.
नायजेरियात बोट उलटली; 27 जणांचा मृत्यू
उत्तर नायजेरियाच्या नायजर नदीत बोट उलटली. या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. यात बहुतांश महिला आहेत. या बोटीत जवळपास 200 लोक बसले होते. सर्व लोक कोगी राज्यातून शेजारच्या नायजर राज्यात जात होते. बचाव पथकांना नदीतून 27 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.