नोएल टाटा यांच्या दोन मुली विश्वस्त मंडळावर
टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांच्या मुली माया आणि लेआ टाटा यांची सर रतन टाटा औद्योगिक संस्थेच्या (एसआरटीआयआय) विश्वस्त मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघी आता अरनाझ कोतवाल आणि फ्रेडी तलाटी यांची जागा घेतील. त्या आधीच पायउतार झाल्या आहेत. आऊटगोइंग ट्रस्टी अरनाज कोतवाल यांनी मात्र या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी विश्वस्तांना यासंबंधी पत्र लिहिले आहे. नवीन विश्वस्त आणण्यासाठी ज्या पद्धतीने राजीनामा देण्यास सांगितले जात होते, ते योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कंपन्यांमध्ये दहा मिनिटांत फूड डिलिव्हरीचा ट्रेंड
हिंदुस्थानात आता क्विक कॉमर्सचा दबदबा वाढत असून अवघ्या दहा मिनिटांत फूड डिलिव्हरीचा ट्रेंड वाढतोय. स्विगी, झोमॅटोसारख्या कंपन्यांमध्ये दहा मिनिटांत फूड डिलिव्हरीचा ऑप्शन मिळत असून कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. आता केवळ ग्रोसरीची डिलिव्हरी दहा मिनिटांत मिळत नाही, तर आयपह्नपासून चार्जरपर्यंतची डिलिव्हरी केवळ दहा मिनिटांत मिळत आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, ब्लिंकइट, बिग बास्केट, रिलायन्स इंडस्ट्रीजचे जिओ मार्टची या सेगमेंटमध्ये एन्ट्री झाली आहे.
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स-निफ्टी आपटले
गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 528 अंकांनी घसरून 77,620 अंकावर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 162 अंकांनी घसरून 23,526 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये बुधवारीसुद्धा 50 अंकांची घसरण झाली होती. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 14 शेअर्समध्ये वाढ, तर 16 शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 22 मध्ये वाढ, तर 28 शेअर्समध्ये घसरण झाली.
दिल्लीच्या एम्समध्ये 220 पदांसाठी भरती
दिल्ली येथील एम्स या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये 220 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विविध विभागात कनिष्ठ निवासी म्हणून भरती प्रक्रिया सुरू आहे. एमबीबीएस आणि बीडीएस पास झालेले विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात. पात्र उमेदवार यासाठी 20 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती संबंधी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, वय, फी, पगार यासंबंधीची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट aiimsexams.ac.in यावर उपलब्ध करण्यात आली आहे.
वर्धापनदिनी पितांबरी पोशाखात दिसणार रामलल्ला
अयोध्येतील राममंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पहिल्या वर्धापनदिनी रामलल्ला पितांबरी पोशाखात दिसणार आहेत. 11 जानेवारी रोजी राममंदिरात विराजमान असलेले बालक राम पितांबरी पोशाखात दिसतील. रामलल्लाच्या उत्सव मूर्ती आणि बालक रामसाठी दिल्लीत विशेष वस्त्र्ाs तयार करण्यात आली आहेत. या वस्त्र्ाांना सोने-चांदीच्या तारा बसवण्यात आल्या आहेत. 11, 12 आणि 13 जानेवारीला प्राणप्रतिष्ठानिमित्त तीन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात अभिषेकाने होईल.
नोकरीसाठी आगीचा गोळा गिळा
चीनमधील एका मोठय़ा कंपनीने आपल्या कर्मचाऱयांच्या बाबतीत केलेला विचित्र प्रकार नुकताच उघड झाला. चिनी कंपनीने कर्मचाऱयांना ‘आगीचा गोळा’ खाण्यास भाग पाडले. ‘टीम-बिल्डिंग’ कार्यक्रमात कर्मचाऱयांना जळत्या कापसाच्या गाठी गिळून ती आग विझवण्यास सांगण्यात आले. कंपनीच्या या अमानवी कृत्याविरोधात आता सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. रोंगरोंग नावाच्या एका नेटीजनने ही घटना सोशल मीडियावर पोस्ट लिहून उघडकीस आणली. संबंधित महिला आगीचा गोळा खायला तयार नव्हती. परंतु नोकरी गमावण्याच्या भीतीने तिला असे करण्यास भाग पाडण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे 60 कर्मचाऱयांनी सहभाग घेतला. ही कंपनी लिओनिंग प्रांतात स्थित एक शिक्षण संस्था आहे. रोंगरोंग हिला हा सगळा प्रकार अपमानस्पद वाटला. या कार्यक्रमाने कामगार कायद्यांचे उल्लंघन केले असून कंपनीविरुद्ध अधिकाऱयांकडे तक्रार दाखल करणार आहे.