हिमस्खलनात गाडलेल्या जवानांचे शव मिळाले
लडाखमध्ये माउंट कुनमध्ये गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हिमस्खलनात जिवंत गाडल्या गेलेल्या 3 जवानांचे शव अखेर मिळाले आहेत. या तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ठाकुर बहादुर अली मगर, रोहित कुमार नेगी आणि गौतम राजवंशी अशी या जवानांची नावे आहेत. या तिघांचे पार्थिव डेहराडून युनिटला आणण्यात आले. तेथे त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. एचएडब्लूएसने 18 जून रोजी ऑपरेशन आरटीजी सुरू केले. शोधमोहीमेत खराब हवामान आणि हिमस्खलनमुळे अनेक अडचणी आल्या होत्या.
लंडनमध्ये पत्रकाराच्या पत्नी, मुलींची हत्या
लंडन शहरात बीबीसीचे रेसिंग समालोचक जॉन हंट यांची पत्नी पॅरोल हंट आणि त्यांच्या दोन मुलींची दिवसाढवळय़ा हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. क्रॉसबोचा वापर करण्यात आला. याप्रकरणी पोलीस काइल क्लिपर्ह्ड या व्यक्तीचा शोध घेत आहेत. हा एक ‘टार्गेटेड किलिंग’चा प्रकार असल्याचे पोलीस म्हणाले. पोलिसांनी या प्रकरणाबाबत सुरू असलेल्या चौकशीबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. बुशई येथे काल रात्री तीन महिलांवर झालेला हल्ला धक्कादायक होता, असे इंग्लंडचे गृहमंत्री यवेट कूपर म्हणाले.
युक्रेनच्या मदतीला अमेरिकेचे जबरी फायटर
युक्रेनच्या मदतीला अमेरिकेचे जबरी फायटर रवाना झाले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी सांगितले F16 लढावू विमानाची पहिली तुकडी युक्रेनला पाठविण्यात येत आहे. नाटो शिखर परिषदेत बोलताना ब्लिंकन यांनी ही माहिती दिली. F 16 डेन्मार्क आणि नेदरलँडहून युक्रेनला पाठविण्यात येत आहे. अमेरिकेचे F 16 हे जगातील सर्वात शक्तिशाली फायटर जेट आहे. हे विमान हवेतून जमिनीवर मारा करण्यात प्रभावी आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता वेगळय़ाच वळणावर गेले आहे.
येस बँकेत भागीदारी; विदेशी कंपन्या उत्सुक
येस बँकेत भागीदारीसाठी अनेक परदेशी कंपन्यांनी इंटरेस्ट दाखवला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार बँकेत 51 टक्के हिस्सेदारीसाठी पश्चिम आशिया आणि जपानमधील अनेक बँका उत्सुक आहेत. जाणकारांच्या मते ही डील 8 ते 9.5 अरब डॉलरमध्ये होऊ शकते. येस बँकेत एसबीआय एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा आणि ऑक्सिस बँकेची 33.74 टक्के हिस्सेदारी आहे. सूत्रांनुसार येस बँकेत 51.69 टक्के भागीदारीसाठी अबू धाबी बँक पीजेएससी, मित्सुबिशी यूएफजे फाइनेंशियल ग्रुप आणि सुमितोमो मित्सुई फाइनेंशियल ग्रुप आघाडीवर आहे.