चॅटजीपीटीला टक्कर; नवे एआय मॉडेल लाँच
ओपनएआयचे चॅटबॉट चॅटजीपीटी मार्पेटमध्ये आल्यापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर आता सर्रास होऊ लागला आहे. गुगलने जेमिनी एआय 9 भाषेत आणले. आता अँथ्रोपिक कंपनी आपले लेटेस्ट जनरेटिव्ह एआय मॉडल क्लाउड 3.5 सॉनेट आणले आहे.
वटवाघळांचे मृत्यू वाढल्याने खळबळ
उत्तर प्रदेशमधील कानपुरातील नाना राव पार्कमध्ये मोठय़ा प्रमाणात वटवाघळे मृतावस्थेत आढळून आली आहेत. वटवाघळांच्या अशा झपाटय़ाने होणाऱया मृत्यूमुळे बदलत्या ऋतुचक्राचा पर्यावरणावर परिणाम होणार काय, असे बोलले जात आहे.
फेरारीची इलेक्ट्रिक कार येतेय!
लक्झरी कार बनवणारी कंपनी फेरारीसुद्धा इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. फेरारी कंपनी लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी करत आहे. या कारची किंमत 4.17 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.
तामीळनाडू दारूकांडातील मृतांची संख्या 47 वर
तामीळनाडूतील कल्लाकुरिची जिह्यात विषारी दारू प्यायल्याने मृतांची संख्या 47 वर पोहोचली आहे, तर 30 जणांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील 24 जण करुणापुरम या एकाच गावातील होते. दारू प्रकरणातील तीन आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना कुड्डालोर तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
हिजबुल्लाह संघटनेची इस्रायलला धमकी
हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरूल्लाह यांनी इस्रायलला धमकी दिली असून आम्ही युद्ध छेडले तर इस्रायलमध्ये कुणी जिवंत राहणार नाही, असा इशारा दिला आहे. इस्रायल आणि हमास युद्ध सुरू असून हिजबुल्लाह ही संघटना इस्रायलविरोधात उभी ठाकली आहे. हिजबुल्लाह या युद्धात उतरली तर इस्रायलमधील एकही जागा आम्ही सोडणार नाही, असे म्हटले आहे.
कोल्ड्रींक पिण्याचे प्रमाण वाढले
हिंदुस्थानात मागील दोन वर्षांत बाटलीबंद कोल्ड्रींग पिण्याचे देशभरात प्रमाण वाढले आहे. 2023 – 24 या आर्थिक वर्षात हे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक झाले आहे, अशी माहिती समोर आली आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंसंदर्भात कांतार एफएमसीजी पल्सचा अहवाल प्रसिद्ध झालाय. वाढत्या उकाडय़ामुले कोल्ड्रींक पिणं वाढल्याचे त्या अहवालात म्हटलंय.