जगभरातून महत्वाच्या बातम्या

दारू दुकानांसाठी 1,756 कोटी 

दारू दुकानांचा लिलाव करण्यात आला असून केवळ एका शहरात हरियाणा सरकारला 1 हजार 756 कोटी रुपये मिळाले आहेत. गुरुग्राममधील पूर्व आणि पश्चिम झोनमधील 162 दारू दुकांनाचा यावेळी लिलाव करण्यात आला. या लिलावासाठी ऑनलाईन निविदा प्रक्रिया पार पडली. गोल्फ कोर्स रोडवरील वाईन शॉपला सर्वाधिक 50.57 कोटी रुपयांची बोली लागली.

ड्रायव्हरविना दिल्ली मेट्रो

दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा लाइनवरील मेट्रो 1 जुलैपासून विना ड्रायव्हर चालवली जाईल. हा मार्ग पूर्णपणे ड्रायव्हरलेस असेल. जूनच्या अखेरपर्यंत मेट्रो पूर्णपणे ऑटोमेटेड होईल. मॅजेंटा लाइनवरील मेट्रो ट्रेनमधील ड्रायव्हर केबिनही हटवले जात आहे. या जागेचा वापर आता प्रवाशांना बसण्यासाठी केला जाणार आहे. मॅजेंटा मार्गानंतर पिंक मार्गावरील मेट्रोसुद्धा ड्रायव्हरलेस केली जाणार आहे. डीएमआरसीच्या कमांडवर ही मेट्रो चालणार आहे. यात कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीचा हस्तक्षेप राहणार नाही.

सीमेवरून 60 कोटींची हेरॉईन जप्त

राजस्थानच्या अनुपगढ जिह्यात पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे केली जात असलेली हेरॉईनची तस्करी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) उधळून लावली आहे. सहा-सहा किलो वजनाची दोन हेरॉईन पाकिटे जप्त करण्यात आली. या हेरॉईनची किंमत 60 कोटी रुपये इतकी आहे. गेल्या काही दिवसांपासून ड्रोनद्वारे हेरॉईन आणि अंमली पदार्थाची तस्करी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.

नदीत टेम्पो बुडाला, 14 भाविकांचा मृत्यू

रुद्रप्रयागमध्ये अलकनंदा नदीत टेम्पो बुडाल्याने 14 भाविकांचा मृत्यू झाला आहे. एकूण 26 जण या टेम्पोमधून प्रवास करीत होते. या दुर्घटनेत 12 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुद्रप्रयाग शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर बद्रीनाथ हायवेवर रैतोलीजवळ हा टेम्पो अलकनंदा नदीत कोसळण्याची घटना घडली.

पाकिस्तानात पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त

पाकिस्तान सरकारने ईद सणानिमित्त पाकिस्तानमधील कोटय़वधी जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी कपात केली आहे. पेट्रोलच्या किमतीत 10.20 रुपये, तर डिझेल 2.33 रुपये पाकिस्तानी रुपयांनी स्वस्त केले आहे. या कपातीनंतर पाकिस्तानात पेट्रोल 258 रुपये प्रति लिटर तर डिझेल 267 रुपये प्रति लिटर झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढली आहे. पाकिस्तानात नुकत्याच निवडणुका पार पडल्या. नवे सरकार आल्यानंतर ही पाकिस्तानमधील महागाई अद्याप कमी झाली नाही. नव्या सरकारने पेट्रोलची पिंमत 10 रुपयांनी कमी केली  असली तरी पेट्रोलचे दर अडीशे रुपयांच्या वर आहे.

काटाचमचा नाही, हाताने जेवतो

हिंदुस्थान आणि फ्रान्समध्ये काही मोठे फरकही आहेत, मुंबईत मित्रांची गळाभेट घेण्याची पद्धत आहे. तसेच येथील लोक हाताने जेवण जेवतात, असे जीन बाप्टिस्टने  व्हिडीओमध्ये सांगितले. फ्रान्समध्ये एक पुरुष दुसऱया पुरुषाची गळाभेट घेऊ शकत नाही. मुंबईत सवय लागल्याने जेव्हा कधी ते फ्रान्समधील आपल्या घरी जातात तेव्हा काटा चमचाऐवजी हाताने जेवण जेवतात. त्यांना हाताने जेवताना पाहून त्यांची अचंबित झाल्याचेही जीन म्हणाले.

रामाफोसा पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी

दक्षिण आफ्रिकेत सिरिल रामापह्सा हे सलग दुसऱयांदा देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. रामापह्सा यांच्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाने (एएनसी) सरकार स्थापन करण्यासाठी सर्वात मोठा विरोधी पक्ष डेमोव्रॅटिक अलायन्स (डीए) सोबत युती केली आहे. यासह आघाडी सरकारकडे आता संसदेत 400 पैकी 283 जागा झाल्या आहेत. नेल्सन मंडेला यांनी स्थापन केलेल्या एएनसी पक्षाने गेल्या 30 वर्षांत पहिल्यांदाच देशात आघाडी सरकार स्थापन केले आहे. दुसऱयांदा माझ्या देशाची सेवा करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. असे राष्ट्राध्यक्ष रामापह्सा यांनी म्हटले आहे.

नोकरीवरून काढले, आता पैशांची मागणी

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स कॉर्प पंपनीचे मालक असलेल्या मस्क यांनी 2022 मध्ये तब्बल 44 अरब डॉलरमध्ये ट्विटरचे हक्क खरेदी केले. यानंतर त्यांनी ट्विटरचे नाव बदलून एक्स कॉर्प असे ठेवले. पंपनी ताब्यात घेतल्यानंतर मस्क यांनी एक्सच्या व्यवस्थापनासह अनेक कर्मचाऱयांना बाहेरचा रस्ता दाखवला. कर्मचारी कपात करताना नुकसान भरपाई देण्यात आली होती. मात्र आता मस्क यांचे म्हणणे आहे की, कर्मचाऱयांना चुकून जास्तीचे पैसे देण्यात आले असून त्यांनी ते पंपनीला परत करावेत.

प्रिन्सेस केट मिडलटन पहिल्यांदा कार्यक्रमात सहभागी

किंग चार्ल्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन हे दोघेही पॅन्सरपीडित आहेत. परंतु केट मिडलटन पॅन्सर आजार झाल्यानंतर पहिल्यांदा सार्वजनिकरीत्या समोर आली आहे. टपिंग द कलर इव्हेंट दरवर्षी जूनमध्ये आयोजित केला जातो. हा इव्हेंट किंगच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जाणारा इव्हेंट आहे. यानिमित्त लंडनमध्ये एक मोठी सैनिक परेड आयोजित केली जाते. किंग चार्ल्स दुसरे यांच्यापासून हा इव्हेंट जूनमध्ये साजरा केला जातो.

फ्रान्समधून शिक्षणासाठी आला अन् मुंबईकर बनला

युरोप आणि अमेरिकेत स्थायिक होणाऱया हिंदुस्थानवासीयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना पश्चिमेकडील गोऱया लोकांनी हिंदुस्थानात घर घेऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटायला नको. 21 वर्षांपूर्वी शिक्षणासाठी हिंदुस्थानात आलेल्या फ्रान्समधील जीन बाप्टिस्ट यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईतच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थानात घालविलेल्या इतक्या वर्षांचा अनुभव त्यांनी युटय़ूबच्या माध्यमातून शेअर केला आहे. तुम्हाला हिंदुस्थानात कधी एकटेपणा जाणवणार नाही. येथील लोक खूप नम्र आहेत. हिंदुस्थानी लोकांमध्ये पश्चिमी अहंकार नाही. ते तुमचे लवकरच मित्र बनतील, असे जीन यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे.