सरकार वीक… म्हणून पेपर लीक…
बिहारच्या पटणामध्ये नीट यूजीच्या निकालावरून विद्यार्थी संघटनेने केंद्र सरकार आणि बिहार सरकार यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केले. पोलिसांनी हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली.
बलात्काराचा खोटा आरोप, महिलेला शिक्षा होणार
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका महिलेला बलात्काराचा खोटा आरोप करणे आता चांगलेच महागात पडू शकते. कोर्टाने या महिलेविरोधात खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या महिलेने दोन जणांविरोधात 9 वर्षांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. परंतु आता महिलेने कोलांटउडी मारली. महिलेच्या या कोलांटउडीनंतर कोर्टाने महिलेविरुद्ध खटला दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच दोन्ही आरोपी तरुणांना आरोपमुक्त करण्याचे निर्देश दिले.
बांगलादेशच्या हिंसाचारामागे चीन–पाकिस्तानचा हात
बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारामागे चीन आणि पाकिस्तान या दोन देशांचा हात असल्याचे बोलले जात आहे. चीनने बांगलादेशात अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. यामुळे तेथे तणाव वाढला आहे. तसेच चीन आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सैन्य अभ्यासामुळेही तणाव वाढल्याचे सांगितले जात आहे. या अभ्यासात दहशतवादविरोधी अभियानावर लक्ष पेंद्रीत करण्यात आले होते.
इथियोपियात भूस्खलनात 146 जणांचा मृत्यू
इथियोपियात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात कमीत कमी 146 लोकांचा मृत्यू झाला आहे. मातीचा ढिगाऱ्याखाली दबून या लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली. मृतांत गर्भवती महिला, छोटय़ा मुलांचाही समावेश आहे. ढिगायाखालून पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत अनेक मुलांनी आपले आई-वडील गमावले आहेत. बचाव मोहीम सुरू आहे.