जगभरातून महत्वाच्या बातम्या

हिंदुस्थानी रुपयाची नीचांकी घसरण

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत हिंदुस्थानी रुपयाची मोठी घसरण झाली आहे. रुपया आतापर्यंत सर्वात खाली घसरला आहे. गुरुवारी रुपयात अचानक 20 पैशांची घसरण झाली आहे. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया आता 83.64 पैशांवर पोहोचला आहे. याआधी 93.57 रुपये प्रति डॉलरवर रुपया होता.

शी।़।़ बटाटा चिप्समध्ये सापडला सडलेला बेडूक

गुजरातमधील जामनगरमध्ये एका तरुणाला वेफर्सच्या पाकिटात सडलेला बेडूक सापडला. याचा कीळसवाणा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बालाजी वेफर्सच्या बटाटा चिप्सच्या पॅकेटमध्ये मृत बेडूक आढळून आला. याप्रकरणी जामनगर महापालिकेने बुधवारी चौकशीचे आदेश दिले.

रशियाउत्तर कोरियात महत्त्वाचे करार

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे 24 वर्षांनंतर पहिल्यांदाच उत्तर कोरियात गेले. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन यांनी पुतीन यांचे रेड कार्पेट टाकून स्वागत केले. या दोन देशांत नव्या करारानुसार, उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यावर कोणत्याही देशाने हल्ला केला तर दोन्ही देश एकत्र येऊन त्या देशाला प्रत्युत्तर देतील.

‘वंदे भारत’मधील जेवणात झुरळ

वंदे भारत ट्रेनमधील जेवणात झुरळ सापडल्याची घटना नुकतीच घडली. भोपाळहून आग्य्राला जाणाऱया ट्रेनमध्ये मंगळवारी हा प्रकार घडला. विदित वर्ष्णे यांनी आपल्या नातेवाईकांच्या वतीने तक्रार करणारी पोस्ट लिहिली आणि पह्टोही शेअर केला. त्यामध्ये एक मृत झुरळ भाजीमध्ये दिसत आहे. ही तक्रार त्यांनी आयआरसीटीसीलादेखील टॅग केली. याप्रकरणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही टॅग करून रेल्वेच्या पॅटरिंग व्यवस्थेवर दंडात्मक कारवाईची मागणी केली. या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेण्यात आली असून सेवा देणाऱया पंपनीला दंड ठोठावण्यात आला आहे.

कुवैत आगीप्रकरणी 3 हिंदुस्थानींसह 8 जणांना अटक

कुवैतमधील आगीप्रकरणी 3 हिंदुस्थानी व्यक्तीसह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये 3 हिंदुस्थानी, 4 इजिप्शिय आणि एक कुवैती नागरिकांचा समावेश आहे. कुवैतमध्ये 12 जून रोजी भल्या पहाटे 6 मजली
इमारतीला आग लागली होती. या आगीत एकूण 50 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 45 हिंदुस्थानी नागरिक होते. या इमारतीत दाटीवाटीने 196 कामगार राहत होते. यातील बहुतेक जण हे हिंदुस्थानी नागरिक होते. अटक करण्यात आलेल्या 8 जणांना 2 आठवडय़ांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

अवघ्या नऊ दिवसांत उष्माघाताने 192 जणांचा मृत्यू

देशभरात अद्याप मान्सून दाखल झाला नसल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. दिल्लीतील तापमान अद्याप कमी झाले नाही. उष्माघातामुळे अनेकांचा मृत्यू होत असून अवघ्या 9 दिवसांत 191 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 11 ते 19 जून यादरम्यान दिल्लीतील 192 बेघर लोकांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. उष्माघात आणि डिहायड्रेशनमुळे हे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 2023 मध्ये उष्माघातामुळे 75 जणांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत 2024 मधील मृतांची संख्या खूप मोठी आहे.

तामीळनाडूत विषारी दारू प्यायल्याने 36 जणांचा मृत्यू

तामीळनाडूमधील कल्लाकुरिची जिह्यात विषारी दारू प्यायल्याने 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सत्तरहून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक जणांची स्थिती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी के. कन्नुकुट्टी याला अटक केली आहे. त्याच्याकडून 200 लिटर अवैध दारू जप्त केली आहे. दारूसाठी तो मेथनॉलचा वापर करत होता, अशीही माहिती समोर आली आहे.