जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी…

अत्याधुनिक पाणबुडीसाठी अमेरिका हिंदुस्थानच्या मदतीला

पाणबुडी, युद्धनौका वा हेलिका@प्टरमधून मारा करता येईल अशी पाणबुडीशोधक प्रणाली सोनोबॉय अमेरिकेकडून हिंदुस्थानी नौदलाला मिळणार आहे. ‘सोनोबॉय’ खरेदीसाठी 52.8 दशलक्ष डॉलरचा करार दोन्ही देशांमध्ये करण्यात आला.

व्हीएल-एसआरएसएएम मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण

डीआरडीओ आणि हिंदुस्थानी नौदलाने ओडिशाच्या चांदीपूर येथील आयटीआरहून व्हर्टिकल शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल (व्हीएल-एसआरएसएएम) चे सलग दुसऱयांदा यशस्वी प्रक्षेपण केले.

युटय़ूब घालणार डीपफेकला आळा

युटय़ूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकजण व्हिडीओ टाकत असतात. अनेकांना युटय़ूब आपलेसे वाटते. मात्र हल्ली एआयच्या मदतीने डीपफेक व्हिडीओंचा धोका वाढला आहे. यामुळे युटय़ूबला अधिक सुरक्षित करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. डिपफेकला आळा घालण्यासाठी युटय़ूब कंपनी नवीन एआय टुल आणणार आहे. नव्या टुलमुळे डीपफेक चेहरा आणि आवाज लगेच ओळखला जाईल. या टुलच्या मदतीने डिपफेक व्हिडीओ व्हायरल होणे बंद होईल. युटय़ूबने अधिपृत ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलंय की, कंपनी एआयशी संबंधित फेस डिटेक्शन टुलवर काम करत आहे. टुल क्रिएटर्सला असे फेक व्हिडीओ आणि पंटेनर डिटेक्ट करण्यास मदत होईल.

फोर्ड कंपनी पुन्हा हिंदुस्थानात येतेय

अमेरिकेची प्रसिद्ध मोटर वाहन निर्माता कंपनी फोर्ड पुन्हा एकदा हिंदुस्थानात परतणार आहे. कंपनीने तीन वर्षांपूर्वी बोजाबिस्तरा गुंडाळून हिंदुस्थानातील व्यापार बंद करण्याची घोषणा केली होती. परंतु आता शुक्रवारी कंपनीने पुन्हा एकदा हिंदुस्थानात येण्याची घोषणा केली आहे. कंपनीने यासंबंधी तामीळनाडू सरकारला लेटर ऑफ इंटेंट सोपवले आहे. कंपनीने चेन्नईला फॅसिलिटीच्या उपयोगासाठी निवड केली आहे. याआधी तामीळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अमेरिका दौऱयावेळी फोर्डच्या प्रमुखांची भेट घेऊन यासंबंधी चर्चा केली होती.

सलूनवाल्याला राहुल गांधींनी पाठवले गिफ्ट

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दाढी आणि केस कापणाऱया सलून- वाल्याला स्पेशल गिफ्ट पाठवले. या स्पेशल गिफ्टमध्ये एक स्पेशल खुर्ची, दोन हेअर कटिंग खुर्ची आणि एक इन्वर्टर बॅटरी आहे.

अभिनेत्री हीना खानने मानले महिमाचे आभार

ब्रेस्ट कॅन्सरशी सामना करत असलेली टीव्ही अभिनेत्री हीना खान हिने बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिचा पह्टो शेअर करत तिचे आभार मानले. कठीन प्रसंगी महिमा चौधरीने खूप मदत केली. प्रोत्साहन दिले, असे हीनाने म्हटले.

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल टीझर

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची उत्सुकता लवकरच संपणार आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलचा टीझर प्रसिद्ध होताच अॅमेझॉननेही आपल्या फेस्टिव्हलचा अधिपृत टीझर रिलिज केला आहे.

किम जोंगने अण्वस्त्रांचा कारखाना दाखवला

उत्तर कोरियाने पहिल्यांदा युरेनियम संवर्धन केंद्राचा पह्टो जगाला दाखवला. उत्तर कोरियाच्या सरकारी मीडियाने हा फोटो शेअर केलाय. त्यावरून किम जोंग अण्वस्त्रांची कशी तयारी करताहेत, याचा अंदाज येतो. किम जोंगने नुकतीच अण्वस्त्रांसाठी लागणारे युरेनियम जिथे साठवले जाते, त्या सेंटर भेट दिली. त्यांनी शास्त्रज्ञांशी चर्चा केली आणि अण्वस्त्रांची संख्या वाढवण्याचे आदेश दिल्याचे समजते. या भेटीचा पह्टो व्हायरल होत आहे. युरेनियम संवर्धन पेंद्र नेमके पुठे आहे, उत्तर कोरियाच्या ‘योंगब्योंन अणू का@म्प्लेक्स’मध्ये आहे का, हे स्पष्ट झालेले नाही. याआधी 2010 मध्ये उत्तर कोरियाने ‘योंगब्योंन अणू का@म्प्लेक्स’ची माहिती जगासमोर आणली होती. स्वरक्षणासाठी अण्वस्त्रांची गरज असल्याचे किम जोंगचे म्हणणे आहे.