मस्क मंगळावर शहर वसवणार
मंगळ ग्रहावर एक स्वयंपूर्ण शहर निर्माण करावे, असे रॉकेट निर्मिती कंपनी स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांचे स्वप्न आहे. येत्या 20 वर्षांमध्ये मंगळावर शहर वसवले जाणार आहे. या मिशनविषयी एलन मस्क यांनी नुकतीच माहिती दिली. मस्क म्हणाले, मंगळावर अन्य सामान्य शहरांप्रमाणे एक शहर उभे करायचे आहे. यासाठी तंत्रज्ञानात दहा हजार पट सुधारणा करणे आवश्यक आहे. मंगळ ग्रहावर जाणारी पहिली स्टारशिप येत्या दोन वर्षांत लाँच केली जाईल. हे बिना क्रू वाले मिशन असेल, ज्यामध्ये रॉकेट मंगळ ग्रहावर किती सुरक्षित उतरू शकेल, याची तपासणी होईल.
970 वर्षांपासून बाप्पाची एकच मूर्ती
मध्य प्रदेशातील पांढुर्णा जिह्यात एक अतिप्राचीन गणपती मठ आहे. या मठात गणेशोत्सव जल्लोषात साजरा होतो. या उत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे तिथे गणरायाच्या खास मूर्तीची प्रतिष्ठापना होते. मागील 970 वर्षांपासून एकच मूर्ती. मूर्तीचा आकार, रचना, वस्त्रs, आभूषणे यामध्ये कोणताही बदल नाही. दरवर्षी अगदी एकसमान. सध्या या प्राचीन मठाच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आलेय. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून गणरायाची प्रतिष्ठापना तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या मंडपात होते.
युक्रेनचा रशियावर पुन्हा ड्रोन हल्ला
बलाढय़ रशियाच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेनने आता धोकादायक ‘ड्रगन ड्रोन’चा वापर सुरू केला आहे. युक्रेनच्या सैन्याने याचा वापर झाडांच्या मागे लपलेल्या रशियन सैनिकांना संपवण्यासाठी केला आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश याचा वापर करत आहेत.
सोने झाले स्वस्त, चांदीतही घसरण
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱया सोने आणि चांदीच्या दरात सोमवारी घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 739 रुपयांनी घसरल्यामुळे सोने आता 71 हजार 192 रुपयांपर्यंत खाली घसरले, तर चांदीच्या किमतीतही घसरण झाली. चांदी 2 हजार 456 रुपयांनी घसरून 80,882 रुपये किलो झाली. मुंबईत 10 ग्रॅम 22
कॅरेट सोन्याची किंमत 66,800 रुपये झाली आहे.
मुंबईत 9 घरांची 900 कोटींना विक्री
मुंबई, दिल्ली यांसारख्या प्रमुख शहरांत 40 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अल्ट्रा लक्झरी घरांची मागणी वाढली आहे. गेल्या आठ महिन्यांत अल्ट्रा लक्झरी घरांच्या किमती 1,00,208 रुपये प्रति स्क्वेअर फूटवरून दोन टक्के वाढून 1,02,458 रुपये प्रति स्क्वेअर फूट झाल्या आहेत. एकूण 25 पैकी 21 डील या एकटय़ा मुंबईत झाल्या असून 100 कोटी रुपये किमतीची नऊ घरे मुंबईत विक्री झाली आहेत.
झुकरबर्गने कमावले 4.20 लाख कोटी
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यावर्षी जबदरस्त कमाई केली आहे. यावर्षी मार्क झुकरबर्ग यांनी 50 अब्ज डॉलर म्हणजे 4.20 लाख कोटी रुपये कमवले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स अनुसार, मार्क जगातील चौथ्या क्रमांकाचे अब्जाधीश आहेत. यावर्षीच्या कमाईत दुसरा नंबर एनविडीया कंपनीचे अध्यक्ष जेसन हुआंग यांचा आहे. अब्जाधीशांच्या यादीत टेस्लाचे मालक एलन मस्क पहिल्या तर दुसऱया क्रमांकावर जेफ बेजोस आहेत.