
वोडाफोन आयडिया (वी)ची 5जी सेवा आता मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्येदेखील उपलब्ध करण्यात आली आहे. या सेवेसोबतच वीची 5जी सेवा देशातील कोलकातामधील ईडन गार्डन्स, नरेंद्र मोदी स्टेडियम (अहमदाबाद) या स्टेडियमसह एकूण 11 स्टेडियममध्ये 5जी सेवा उपलब्ध झाली आहे. ज्या युजर्सकडे 5जी स्मार्टफोन आहे, त्यांना ही सेवा मिळणार आहे.
फॉक्सकॉन 300 एकर जमीन खरेदी करणार
तैवानची कंपनी फॉक्सकॉन उत्तर प्रदेशात 300 एकर जमीन खरेदी करणार आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे नवा प्रकल्प उभारण्यासाठी ही जमीन खरेदी केली जाणार आहे. फॉक्सकॉनचा उत्तर भारतातील हा पहिला प्लॅंट असणार आहे. याआधी फॉक्सकॉनचा बंगळुरूमध्ये प्लॅंट आहे, परंतु उत्तर प्रदेशातील प्लॅंट हा बंगळुरूपेक्षा मोठा असणार आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.
अंतराळ प्रवास करून ‘रणरागिणी’ परतल्या!
अमेरिकन उद्योगपती जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या रॉकेटमधून अंतराळ प्रवास करून 6 महिला यशस्वीपणे पृथ्वीवर परतल्या. या महिलांमध्ये प्रसिद्ध हॉलीवूड गायिका केटी पेरी, आयशा बॉवे, अमांडा न्यूगेन, गेल किंग, कॅरिन फ्लिन आणि लॉरेन सांचेज यांचा समावेश होता. या काळात रॉकेटने 200 किमी अंतर कापून यशस्वीपणे पृथ्वीवर परतण्याची किमया करून दाखवली. या मिशनदरम्यान गायिका केटी पेरीने लुई आर्मस्ट्राँगचे ‘व्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड’ हे गाणेसुद्धा गायले.