जगभरातून महत्त्वाच्या बातम्या…

सिग्नेचर पूल कोसळला

उत्तराखंडमध्ये तयार होत असलेला पहिला सिग्नेचर ब्रिज कोसळला. ऋषिकेश-बद्रीनाथ हायवेवर रुद्रप्रयागजवळ नरकोटा येथे 110 मीटर लांबीचा सिग्नेचर पुलाचे काम सुरू असताना कोसळला. रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 2021 पासून या पुलाचे निर्माण कार्य सुरू आहे. याआधी 2022 साली पुलाचे बेस कोसळून 3 कामगारांचा मृत्यू झाला होता.

कुत्र्यांचा डिलिव्हरी बॉयवर हल्ला

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये एका डिलिव्हरी बॉयवर दोन पिटबुल कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला आहे. सलमान खान असे डिलिव्हरी बॉयचे नाव असून तो रायपूरमधील अनुपम नगर कॉलनीत एका महिला डॉक्टरचे सामान पोहोचवण्यासाठी घरी गेला होता. महिलेने दरवाजा उघडताच या दोन कुत्र्यांनी डिलिव्हरी बॉयवर हल्ला केला.

11 लाख शेतकरी कर्जमुक्त होणार

तेलंगणातील 11 लाख शेतकऱयांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेचा शुभारंभ केला. कृषी कर्जमाफी योजना तीन टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे. 11 लाख शेतकऱयांना लाभ देण्यासाठी बँकेला 6,098 कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सांगितले.

रेल्वे धावण्यासाठी चिनाब ब्रिज सज्ज

जम्मू-कश्मीरच्या रियासी जिह्यात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच स्टीलच्या आर्च ब्रिजवरून पहिली ट्रेन स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी धावणार आहे. सांगलदन ते रियासीदरम्यान धावणारी ही रेल्वे सेवा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पाचा भाग आहे. 20 जून रोजी या पुलावर ट्रेनची ट्रायल रन झाली.

20 हजार फ्रेशर्संना नोकरी मिळणार

आयटी कंपनी इन्फोसिस 20 हजार फ्रेशर्संना नोकरी देणार आहे. पंपनीने याआधी आर्थिक वर्ष 2024 मध्ये 11,900 फ्रेशर्संना नोकरी दिली आहे, तर 2023 मध्ये 50 हजार तरुणांना नोकरी दिली होती. इन्पहसिसचे सीएफओ जयेश संघराजका यांनी या भरतीसंबंधी माहिती दिली. आम्ही पॅम्पस आणि पॅम्पस बाहेरील फ्रेशर्संना नोकरी देण्याचे ठरवले आहे.

विवो, सॅमसंगला मागे टाकत शाओमी अव्वल

गेल्या अनेक महिन्यांपासून अव्वल स्थानापासून वंचित राहिल्यानंतर शाओमी मोबाईल पंपनी पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आली आहे. पॅनालिसने केलेल्या सर्व्हेमध्ये विवो आणि सॅमसंगला मागे टाकत शाओमीने पहिले स्थान पटकावले आहे. वर्षाच्या दुसऱया तिमाहीत पंपनीने 18 टक्के मार्पेट शेअर गाठले. पंपनीने 5 जीवर लक्ष पेंद्रित केले असून प्रत्येक श्रेणीमध्ये उपकरणे लॉन्च केली आहेत. दुसऱया तिमाहीत स्मार्टपह्न मार्पेटमध्ये केवळ 1 टक्के वाढ झाली आहे. सॅमसंगने यंदा 61 लाख पह्न्सची विक्री केली.