क्रीडा विश्वातील महत्लाच्या घडामोडी

सुर्वे क्रिकेट स्पर्धा 17 डिसेंबरपासून

ठाणे फ्रेंड्स युनियन क्रिकेट क्लबतर्फे माजी रणजीपटू तुकाराम सुर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खेळवण्यात येणाऱया 16 वर्षे वयोगटातील चार संघांच्या पहिल्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड चाचणी रविवारी सेंट्रल मैदानावर पार पडली. ही स्पर्धा 17 डिसेंबर ते 3 जानेवारीदरम्यान रंगणार असून स्पर्धेतील सामने सेंट्रल मैदान आणि दादोजी काsंडदेव स्टेडियममध्ये खेळले जातील, असे स्पर्धेचे प्रमुख संयोजक अतुल सुर्वे यांनी सांगितले.

महिंद्रा पार्कचा विजय

महिंद्रा पार्कने एनबीए बास्केटबॉल स्पर्धेच्या 18 वर्षांखालील मुलींच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात यजमान नागपाडा बास्केटबॉल असोसिएशनविरुद्ध 47-35 असा संघर्षपूर्ण विजय नोंदवला. निकाल ः 18 वर्षांखालील मुली ः महिंद्रा पार्क (हृदिनी सावर्डेकर 17, लारन्या अमीन 13, ग्रेस परेरा 10) 47-35 विजयी वि. नागपाडा बास्केटबॉल असोसिएशन (लक्ष्मी गुप्ता 14, सायरा शाह 12).

एमआयजी उपांत्य फेरीत

सलामीवीर वरुण लवंदेच्या शतकी खेळीच्या (101) जोरावर एमआयजी क्रिकेट क्लबने मुंबई पोलीस जिमखान्यावर 7 विकेट राखून विजय मिळवत 108 व्या पुरुषोत्तम ढाल क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
27.3 षटकांत सर्वबाद 125 (हर्षवर्धन बी. 46, योगेश शिंदे 22; जितेंद्र पालीवाल 3/19, अथर्व भोसले 3/23, राहुल सावंत 3/46) वि. पी. जे. हिंदू जिमखाना – 21.5 षटकांत 1 बाद

अंशुमनला नमवत ध्रुव गटविजेता

कामगार महर्षी गं.द. आंबेकर स्मृती 14 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (3.5 गुण) पांढऱ्या मोहऱ्यानिशी खेळणाऱया अपराजित अंशुमन समळला (3.5) 25 व्या मिनिटाला बरोबरीत रोखले आणि सरस सरासरीच्या बळावर अपराजित ध्रुव जैनने गटविजेतेपदावर झेप घेतली.