सोने पुन्हा महागले
नवीन वर्षाच्या तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. आज शुक्रवारी राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव जवळपास 79,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला. तर चांदीचा भाव 230 रुपयांनी घसरून 90,400 रुपये किलो झाला. त्याच वेळी मुंबईत एक तोळे सोने घेण्यासाठी 79,200 रुपये मोजावे लागत आहेत.
होंडा एसपी160
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने नवीन एसपी160 लॉन्च केली आहे. आधुनिक राइडरसाठी सुसज्ज असलेली ही बाईक तरुणाईचे लक्ष वेधत आहे. यामध्ये नवीन डिझाइनसह सर्वोत्तम कार्यक्षमता आणि हाय-टेक वैशिष्टय़े देण्यात आले आहेत. नवीन होंडा एसपी160 ची किंमत 1,21,951 रूपयांपासून सुरू होते.
जिओचा आयपीओ
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे टेलिकॉम युनिट जिओच्या आयपीओची प्रक्रिया सुरू झाली असून याची किंमत 35 हजार ते 40 हजार कोटी एवढी असू शकते. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असेल. रिलायन्स ग्रुपने वर्षाच्या दुसऱया सहामाहीत आयपीओ लॉन्च करण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. प्री-आयपीओ प्लेसमेंटसाठी पंपनीने गुंतवणूकदारांशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.
टाटा मोटर्स सुस्साट
टाटा मोटर्सने आर्थिक वर्ष 2024-25च्या तिसऱया तिमाहीत एकूण 2,35,599 वाहनांची विक्री नोंदवली. ही विक्री देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 2,34,981 एवढी विक्री झाली होती. अर्थात यंदा मागील विक्रीच्या तुलनेत किरकोळ वाढ झाली आहे. टाटा मोटर्सने डिसेंबर 2024मध्ये 76,599 वाहनांची देशांतर्गत विक्री नोंदवली.
निस्सानची चांदी
निस्सान मोटर इंडियाने डिसेंबर 2024मध्ये एका महिन्यात 11,676 गाडय़ांची सर्वोत्तम विक्री केली. तसेच या महिन्यात न्यू निस्सान मॅग्नाईट एसयूव्हीच्या बुकिंगचा आकडा 10,000 पार गेला. 2024 या वर्षात 91,184 गाडय़ा विकल्या गेल्या. डिसेंबर 2024मध्ये 9,558 गाडय़ा निर्यात करण्यात आल्या. 2023मध्ये ही निर्यात 5,561 एवढी होती. त्यामुळे वार्षिक वाढ 72 टक्के ठरली.
गुंतवणूकदारांचे नुकसान
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या मूल्यांकनात घसरण दिसून आली. बीएसईचे मार्पेट पॅप 80 हजार कोटी रुपयांनी घसरून 449.67 लाख कोटी रुपये झाले. आधी हा आकडा 450.47 लाख कोटी एवढा होता.
एसयूव्ही व्रेटाची इलेक्ट्रिक कार
ह्युंदाई मोटर इंडियाने हिंदुस्थानात लोकप्रिय असलेल्या मध्यम आकाराच्या एसयूव्ही व्रेटाच्या इलेक्ट्रिक कारची झलक दाखवली आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये ही गाडी लॉन्च केली जाईल. कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर तब्बल 473 किलोमीटर धावू शकते असा पंपनीचा दावा आहे.
‘वायू’ पाय पसरणार
हिंदुस्थानातील नामांकित फूड डिलिव्हरी अॅप वायूने देशभरातील 25 शहरांमध्ये विस्ताराची घोषणा केली आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये 10,000 रेस्टॉरंट्स, एका वर्षात 25,000 आणि तीन वर्षांत एक लाख रेस्टॉरंट उभारण्याचे वायूचे लक्ष्य आहे. देशातील ऑनलाईन फूड डिलिव्हरी बाजारपेठेतील तीस टक्के हिस्सा काबीज करण्याचाही प्रयत्न आहे. वायू अॅप हे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सद्वारे सक्षम आहे. वायूने कमिशन शुल्क काढून हिंदुस्थानातील फूड डिलिव्हरीमध्ये क्रांती घडवली असल्याचे वायूचे सहसंस्थापक आणि सीईओ मंदार लांडे यांनी सांगितले.
रेडमी टर्बो 4 स्मार्टपह्न
शाओमी या टेक पंपनीच्या सब-ब्रँड रेडमीने चीनमध्ये रेडमी टर्बो 4 स्मार्टपह्न लॉन्च केला आहे. 6550एमएएच बॅटरीसह येणारा हा पह्न हिंदुस्थानात पोको एक्स7 प्रो या नावाने विकला जाईल. विशेष म्हणजे मीडिया टेक डिमेनसिटी 8400-अल्ट्रा चिपसेट असलेला हा जगातील पहिला स्मार्टपह्न आहे. तसेच पह्नमध्ये 50एमपी पॅमेरा आणि 16जीबी रॅमची सुविधा देण्यात आली आहे. चीनमध्ये हा पह्न चार प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला असून स्टोरेज आणि रॅमनुसार प्रत्येक पह्नची किंमत ठरवण्यात आली आहे. 12 जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेजसह बेस व्हेरिएंटची किंमत 23,490 रुपये आहे.