दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांना हटवण्यासाठी आणलेला महाभियोग प्रस्ताव अयशस्वी ठरल्याचे वृत्त आहे. विरोधकांकडे केवळ 192 खासदार होते. तर सत्ताधारी पक्षाच्या तीन खासदारांनीही त्यांच्या बाजूने मतदान केले. परंतु, त्यांना महाभियोग प्रस्तावासाठी आवश्यक 200 मते जमवता आली नाहीत. यानंतर मतमोजणी न करताच हा प्रस्ताव रद्द करण्यात आला.
महाभियोगावर मतदान करण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या 108 पैकी 107 खासदारांनी सभागृहातून वॉकआऊट केले होते. परंतु, नंतर यापैकी 3 खासदार परतले. दक्षिण कोरियाच्या संसदेचे अध्यक्ष वू वोन शिक यांनी हा निकाल अत्यंत खेदजनक आणि लोकशाहीसाठी लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली. 3 डिसेंबर रोजी यून यांनी देशात मार्शल लॉ लागू केला. विरोधी पक्ष उत्तर कोरियाशी संगनमत करत असल्याचा आणि देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणला. दरम्यान, राष्ट्रपतींच्या महाभियोगासोबतच दक्षिण कोरियाच्या सभागृहात त्यांच्या पत्नीच्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणावरही मतदान सुरू आहे.
राष्ट्राध्यक्षांनी डोके टेकवून जनतेची माफी मागितली
मार्शल लॉ लागू केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष यून-सुक योल यांनी देशाची माफी मागितली आहे. त्यांनी थेट टीव्हीवर डोके टेकवले आणि जनतेसमोर मार्शल लॉ लादणे चुकीचे असल्याचे कबूल केले. परंतु, त्यांनी राजीनामा जाहीर केला नाही. मार्शल लॉ लागू करण्याचा निर्णय मी राजकीय किंवा कायदेशीर कारणांसाठी नाही तर नैराश्यापायी घेतल्याचे सांगितले.