रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे कुठल्या पक्षाचे ते लगेच जाहीर करा; जयंत पाटील यांची मागणी

भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची छेड काढण्याला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. अशा घटनेत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे कुठल्या पक्षाचे ते लगेच जाहीर करा, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.

याबाबत एक्सवर पोस्ट करत जंयत पाटील यांनी संतपा व्यक्त केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलीशी काही टवाळक्यांनी छेडछाड केल्याची बातमी वाचली. हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. या गोष्टीचा निषेध करावा तितका कमी आहे. सध्याच्या काळात राज्यात मवालीगीरी वाढली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनी सुरक्षित नाहीत. त्यामुळे असे गुन्हे महाराष्ट्रात राजरोसपणे घडत आहे. परंतु याबाबत शासन कोणतीही कडक पावले उचलत नाही म्हणून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही. जर केंद्रीय मंत्र्यांची मुले सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाचे काय? असा गंभीर प्रश्न या प्रकरणातून उभा राहिला आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणतात की एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. असे असेल तर लवकरात लवकर त्यांनी त्या पक्षाचे नाव जाहीर करावे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.