
‘म्हाडा’च्या कोकण मंडळातर्फे बुधवारी मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली म्हाडा मुख्यालयात पहिल्या जनता दरबार दिनाचे आयोजन केले होते. यात 24 तक्रार अर्जांवर सुनावणी झाली. त्यापैकी 18 तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात आले.
या जनता दरबारात विरार येथील बोळींज प्रकल्पातील पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, इमारतींची देखभाल संस्था स्थापन करून देखभाल संस्थेकडे हस्तांतर तसेच भाडेपट्टा करारनाम्यांचे नूतनीकरण आदी मुद्दय़ांवरील तक्रारी उपस्थित करण्यात आल्या. त्यावर तत्काळ व योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश रेवती गायकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.