सावधान…उन्हाचा तडाखा वाढणार; हवामान खात्याचा अलर्ट

राज्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला. उष्णतेच्या लाटेने अंगाची लाही लाही होणार आहे. या काळात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात उष्णतेचा प्रकोप वाढणार आहे. राज्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उन्हाचा तडाखा वाढणार असल्याने हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे.

राज्यात विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. चंद्रपूरमध्ये तापमान 45.8 अंशांवर पोहचले. तर अकोला, अमरावती, नागपूर आणि ब्रह्मपूरी या शहरांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा पार केला आहे. पश्चिम विदर्भासह पूर्व भागातील अनेक शहरांमध्ये उष्णतेचा पारा वाढणार आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात तापमानात वाढ होणार आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूरसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीतील नागरिकांना सुद्धा उष्ण लाटेचा सामना करावा लागणार आहे. तसेच मुंबई आणि परिसरात उष्णतेसह उकाडाही सहन करावा लागणार आहे.

हवामान खात्याने गुरवारापासून 29 एप्रिलपर्यत देशातील अनेक भागांना उष्णतेचा अलर्ट दिला आहे. मध्य प्रदेशातील अनेक भागाना उन्हाचा तडाखा बसेल. 26 एप्रिलपर्यंत उत्तर प्रदेश, विदर्भ, बिहार, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमधील गंगा मैदानी क्षेत्रात उष्णतेच्या लाटेच्या अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 24 आणि 25 एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेचा फटका बसण्याची शक्यता आहे.