
अवकाळी पाऊस आणि रणरणत्या उन्हाचा फटका नागरिकांना बसतो आहे. अशात हवामान विभागाने शेतकऱ्यांना सर्वांना दिलासा देणारे आनंददायी वृत्त दिले आहे. यंदा सामान्यपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवमान विभागाने वर्तवला. या वर्षी सरासरीच्या 105 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आनंदवार्ता! यंदा सरासरीच्या 103 टक्के पाऊस बरसणार; स्कायमेटचा पावसाचा पहिला अंदाज जाहीर
यंदा सरासरी 103 टक्के पावसाचा अंदाज खासगी हवामान अंदाज वर्तवणारी संस्था स्कायमेटने काही दिवसांपूर्वी वर्तवला होता. असाच अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नैऋत्य मान्सून 2025 च्या हंगामी अंदाजानुसार यंदा संपूर्ण देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस असेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. सरासरीच्या 105 टक्के पाऊस पडेल, असे हवामान विभागाने अंदाजात नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदवार्ता आहे.
मान्सून २०२५ चा अंदाज, IMD pic.twitter.com/ueVbyyunhl
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 15, 2025