काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाची बरसात होणार आहे. मान्सून पुन्हा अॅक्टिव्ह मोडवर आला असून शनिवारपासून मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात 18 आणि 19 सप्टेंबर रोजी मराठवाड्यासह खान्देशात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे आणि रायगडसह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शुक्रवारी जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी विदर्भ, मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रविवारी विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित भागात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे.