बकऱ्यांची अवैध वाहतूक करणारी वाहने जप्त; परिवहन विभागासह कुर्ला, देवनार पोलिसांची कारवाई

कुर्ला आणि देवनार परिसरात परिवहन विभागाच्या वायू पथकाने पोलिसांच्या मदतीने कारवाई करत जनावरांची अवैध वाहतूक करणारे वाहन जप्त केले. यातून 77 बकऱ्या कत्तलीसाठी नेल्या जात होत्या. वाहनावर दंडात्मक कारवाई करून वाहन पालिकेच्या बाजार खात्याच्या दक्षता पथकाकडे सोपवण्यात आले तर वाहनातील 77 बकऱ्या देवनार पशुधगृह येथे जमा करण्यात आल्या. कुर्ला येथील नेहरूनगर पोलीस ठाणे आणि देवनार पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समितीच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती ही मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश अभय ठिपसे आणि निमंत्रक अजय मराठे असून समितीच्या सदस्यांमध्ये विविध विभागांचा समावेश आहे.