Worli Hit and Run : जुहूतील तापस बारवर बुलडोझर कारवाई, पोलिकेने अवैध बांधकाम पाडले

वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याने त्याच्या मित्रासोबत ज्या बारमध्ये पार्टी केली त्या जुहूतील वीस ग्लोबल तापस बारवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी पालिकेने या बारचे अवैध बांधकाम पाडले आहे.

मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभाग (एक्साईज)या बारवर कारवाई केली आहे. एक्साईज विभागाने बारच्या मालकाला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. तसेच सुनावणी होईपर्यंत बारमध्ये दारूविक्री आणि खरेदीचे व्यवहार करू नये अशा सूचना देखील दिल्या होत्या.