नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा राज्यनिर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या दारू तस्करीचा पर्दाफाश करीत तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईत एकूण एक हजार 668 मद्याच्या बॉटल्स जप्त केल्या, तर 9 आरोपींना अटक केली. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपअधीक्षक सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.