
बोगस रेरा नोंदणी घेऊन अनधिकृत इमारती उभारण्याचे बिंग फुटल्यानंतर न्यायालयाने कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारतींवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. केडीएमसीही आता बेकायदा बांधकामांविरोधात अॅक्शन मोडवर आली आहे. बेकायदा इमारती उभ्या राहण्याआधीच खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार पालिकेने 18 दिवसांत टिटवाळा परिसरातील 645 अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकला आहे.
पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी नव्याने उभारली जाणारी बेकायदा बांधकामे पूर्ण होण्यापूर्वीच जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले. आहेत. यानंतर प्रशासनाने आक्रमक भूमिका। घेतली असून अवघ्या १८ दिवसांत टिटवाळा परिसरात तब्बल ६४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. महापालिका हद्दीत आधीच तयार असलेल्या आणि रहिवासी असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे केडीएमसी प्रशासनाने कायदेशीर मार्गांचा अवलंब करत या समस्येबर उपाय | शोधण्याचा प्रयत्न केला। आहे. यामुळे बेकायदा बांधकामे रोखण्यात मोठे यश मिळण्याची शक्यता । आहे.
104 नळजोडण्या खंडित
टिटवाळा परिसरातील बनेली, बल्याणी, मांडा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू होती. काही आठवड्यांपूर्वीच प्रभाग अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त झालेल्या प्रमोद पाटील यांनी या भागात आक्रमक कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईत पूर्ण बांधलेल्या ८६ रूम्स जमीनदोस्त केल्या, ४४१ नवीन फाऊंडेशन उध्वस्त केले, रिंगरोड प्रकल्पातील बाधित ११८ अनधिकृत रूम्स पाडल्या. १०४ अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या.