Budget 2025 – डॉक्टर बनण्याची संधी! मेडिकल कॉलेजच्या 75 हजार जागा वाढवणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी 10 महत्त्वाच्या घोषणा केल्या. कृषी क्षेत्र, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. देशातील 5 IIT मध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असे त्यांनी सांगितले आहे.

निर्मला सीतारामन यांनी शिक्षण क्षेत्रासंबंधीत अनेक घोषणा केल्या. आयआयटी पटणाचा विस्तार करण्यात येणार आहे. आयआयटी पाटणामध्ये वसतिगृह बांधले जाणार आहे. तसेच फेलोशिपची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. तसेच आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (AI) संबंधित शिक्षणासाठी बजेटमध्ये 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर 3 नवीन एक्सीलेंस सेंटर स्थापन केली जातील. याचप्रमाणे पुढील 5 वर्षांत मेडिकल कॉलेजमध्ये 75 हजार जागा वाढवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी अर्थसंकल्पात केली आहे. तसेच पुढील वर्षी 10 हजार अतिरिक्त जागा वाढवण्यात येणार आहेत.

शिक्षणासाठी इतर महत्त्वाच्या घोषणा

– एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाईल, यामुळे रोजगार वाढण्यास मदत होईल.

– पीएम रिसर्च फेलोशिपसाठी 10 हजार फेलोशिपची घ

– वित्त सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 लाँच

– 50 हजार अटल टिंकरिंग लॅबची स्थापना केली जाईल

– सर्व माध्यमिक शाळांमध्ये ब्रॉडबँडची सुविधा असेल

– भारतीय पुस्तक योजना सुरू केली जाईल

– प्राथमिक उपचार केंद्रांना ब्रॉडबँड सुविधा

या अर्थसंकल्पात देशातील एमबीबीएसच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एमबीबीएसमध्ये प्रवेश घेणे आता आणखी सोपे होणार आहे. याशिवाय वैद्यकिय क्षेत्राबाबतही अनेक घोषणा केल्या आहेत. दरम्यान, येत्या पाच वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या जागा वाढवण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.