
आयआयएम कोलकातामध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीला पदवी मिळण्याआधीच 3.5 लाख रुपये प्रति महिन्याची इंटर्नशिप मिळाली आहे. पदवी मिळण्याआधीच 3.5 लाखांच्या इंटर्नशिपची नोकरी मिळाल्याने पदवीला महत्त्व नाही का? असा सूर सोशल मीडियावर सुरू झाला आहे. मुंबईच्या साक्षी जैनने यासंबंधीची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. साक्षीच्या मैत्रिणीला इंटर्नशिपची ऑफर मिळाली आहे. तिला अवघ्या दोन महिन्यांत 7 लाख रुपये मिळणार आहेत. या पोस्टला आतापर्यंत 15 लाखांहून जास्त ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले, आयआयटीच्या विद्यार्थ्याला दोन महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी 25 लाख रुपये मिळाले. याचाच अर्थ 12.5 लाख रुपये प्रति महिना मिळणार आहेत.