
आपल्याला प्रत्येकीला लांब केस आवडतात. परंतु धूळ आणि प्रदुषणामुळे सध्या केसांची वाढ खुंटू लागली आहे. केसवाढीसाठी अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु रासायनिक उत्पादनांमुळे केसांवरही विपरीत परीणाम होऊ लागतो. अशावेळी पूर्वापार चालत आलेले अनेक उपाय कामी येतात. काळा चहा हा त्यातलाच एक महत्त्वाचा उपाय. चहामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म टाळू निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच चहा आपल्या डोक्यावरील त्वचेवर लावल्याने केसांमध्ये कोंडा आणि खाज येण्याची समस्या उद्भवत नाही. केसांची वाढ उत्तम करायची असेल तर, बाजारातील उत्पादनांपेक्षा काळा चहा हा एक उत्तम पर्याय आहे.
काळा चहा कसा बनवाल?
यासाठी तुम्हाला 3 ते 4 काळ्या चहाच्या बॅग्ज घ्याव्या लागतील. या टी बॅग्ज पाण्यात उकळवा. मग हे पाणी थंड होऊ द्यावे लागेल. हे पाणी तुमच्या केसांना लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यानंतर, केस शॅम्पूने स्वच्छ करा. हा चहा केसांना लावल्याने तुमचे केस ओलावा टिकून राहतील. तसेच केस गळतीची समस्याही कमी होईल.
काळ्या चहाचा स्प्रे
तुम्हाला कमी वेळात केसांची वाढ हवी असल्यास, या चहाचा स्प्रे देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला चहा उकळून घ्यावा लागेल. त्यानंतर तो थंड झाल्यावर बाटलीत भरावा. केसावर हे पाणी स्प्रे करुन, नंतर 30 मिनिटे तसेच राहू द्यावे.
यानंतर, केस शॅम्पूने स्वच्छ करा. हा स्प्रे लावल्याने तुमच्या केसांची वाढ सुधारेल.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)