
टोल प्लाझावर गाडय़ांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी फास्टॅग तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात आली. परंतु अनेक वाहनचालक आपल्या गाडीच्या समोरच्या काचेवर फास्टॅग लावत नाहीत किंवा गाडीच्या विंडशील्डला फास्टॅग जोडत नाहीत. त्यामुळे टोल प्लाझावर नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र आतापासून वाहनाच्या समोरच्या काचेवर फास्टॅग लावला नसल्याचे आढळल्यास दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवा नियम बनवला आहे. नव्या नियमानुसार, वाहनाच्या समोरच्या विंडशील्डला फास्टॅग जोडणे बंधनकारक आहे. ज्यांच्या वाहनावर फास्टॅग योग्य प्रकारे लावलेला नसेल अशांना भुर्दंड बसणार आहे. फास्टॅग योग्य प्रकारे लावलेला नसल्यामुळे टोल प्लाझावर नाहक विलंब होतो. हे टाळण्यासाठा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवा नियम बनवला आहे.