25 तारखेची लढाई अंतिम, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याची केली आहे. 25 जानेवारीला मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील, असा इशारा त्यांनी महायुती सरकारला दिला आहे. नांदेडच्या लोहा येथे मराठा आरक्षण संवाद बैठकीत ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ”आधीचे जे सरकार होतं, तेच आताही आहे. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कोणीही अडथळा आणणार नाहीत. 25 जानेवारीला ते मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील. मात्र त्यांच्या मनात जर मराठ्यांविषयी द्वेष असेल तर ते मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढणार नाही.”

जरांगे म्हणाले की, ”देवेंद्र फडणवीस आधी म्हणायचे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, मी त्यांना अडथळा आणत नाही. मात्र काम होतं नव्हतं. आता तुम्ही अडथळा आणत नाही ना? आता मुख्यमंत्री तुमीच आहात. आता आम्ही मराठे बघणार अडथळा कोण आहे.” दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला 25 जानेवारी रोजी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे.