आयडीबीआय बँकेत 119 पदांसाठी भरती

आयडीबीआय बँकेत डेप्यूटी जनरल मॅनेजर, असिस्टेंट जनरल मॅनेजर आणि बँक मॅनेजरसह एकूण 119 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 7 एप्रिलपासून सुरू केली जाणार आहे. तर उमेदवार 20 एप्रिलपर्यंत अर्ज भरू शकतात. या भरतीमध्ये डेप्यूटी जनरल मॅनेजरची 8 पदे, असिस्टेंट जनरल मॅनेजरची 42 पदे तर बँक मॅनेजरची 69 पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँकेची अधिकृत वेबसाइट idbibank.in वर देण्यात आली आहे.