कोरोनानंतर तरुणांच्या अकस्मात मृत्यूंची संख्या वाढली होती. कोरोना लसींचा दुष्परिणाम याला कारणीभूत असल्याच्या बातम्या तेव्हा आल्या होत्या. मात्र, अकस्मात मृत्यूंमागे कोरोना लस हे कारण नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत स्पष्ट केले आहे. आयसीएमआरने 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींचा अभ्यास करून काढलेल्या निष्कर्षाचा त्यांनी दाखला दिला. कोरोना काळात रुग्णालयात जास्त दिवस दाखल राहणे, कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा आघात, अतिमद्यपान, नशाबाजी, अतिव्यायाम अशी कारणे या मृत्यूंमागे असल्याचे यात नमूद केले आहे.