वन डे क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम, बांगलादेशच्या दोन गोलंदाजांनी टिपले 5-5 बळी

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या महिला वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीत बांगलादेश व थायलंड संघांमधील सामन्यात तब्बल 1977 नंतर एक अनोखा विक्रम रचला गेला. बांगलादेशच्या दोन गोलंदाजांनी 5-5 बळी टिपण्याचा विक्रम केला. महिला क्रिकेटमध्ये हा विक्रम पहिल्यांदाच घडला. मात्र, पुरुष क्रिकेटमध्ये 1977 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोन गोलंदाजांनी 5-5 बळी टिपण्याचा विश्वविक्रम केला होता.

बांगलादेशच्या महिला संघाने एकतर्फी लढतीत थायलंडवर 178 धावांनी विजय मिळविला. या लढतीत बांगलादेशने 3 बाद 271 धावसंख्या उभारली. यात कर्णधार सुल्ताना निगर (101), शर्मिन अख्तर (नाबाद 94) व फरगाना हक (54) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. प्रत्युत्तरादाखल थायलंडचा 28.5 षटकांत केवळ 93 धावांवर खुर्दा उडाला.

पाकिस्तानकडून फहिमान खातून व जन्नतुल फेरदस यांनी 5-5 फलंदाज बाद करण्याचा पराक्रम केला. महिला क्रिकेटमध्ये दोन गोलंदाजांनी5-5 बळी टिपण्याची ही पहिलीच वेळ असली, तरी पुरुष क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गॅरी कोसिएर व ग्रेग चॅपल यांनी इंग्लंडविरुद्ध 1977 मध्ये सर्वप्रथम 5-5 बळी टिपण्याचा विक्रम केला होता. या विक्रमाची बरोबरी होण्यासाठी तब्बल 48 वर्षांचा कालावधी लागला, हे विशेष.