महिलांच्या युवा टी-20 विश्वचषकाची फटकेबाजी आजपासून, हिंदुस्थानचा पहिला सामना वेस्ट इंडिजशी

महिलांच्या युवा अर्थातच 19 वर्षांखालील टी-20 विश्वचषक स्पर्धेचा थरार शनिवारपासून मलेशिया येथे रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड, इंग्लंड विरुद्ध आयर्लंड, सामोआ विरुद्ध नायजेरिया या तीन सामन्यांनी या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर, हिंदुस्थानच्या मोहिमेची सुरुवात 19 जानेवारी रोजी वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्याने होणार आहे.

चार गटांमधून प्रत्येकी 3 संघ हे सुपर सिक्ससाठी पात्र ठरतील. 12 संघांची पुन्हा दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप १ मध्ये ‘अ’ व ‘ड’ गटातील अव्वल तीन संघ असतील, तर ग्रुप 2 मध्ये ‘ब’ व ‘क’ गटातील अव्वल तीन संघ खेळणार आहेत. सुपर सिक्समध्ये प्रत्येक विजय, गुण व नेट रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे. या गटात प्रत्येक संघ दोन सामने खेळतील आणि त्यानंतर दोन्ही ग्रुपमधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने 31 जानेवारीला होतील, तर अंतिम सामना 2 फेब्रुवारी रोजी रंगणार आहे.

जीओ स्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विश्वचषक

स्पर्धेतील सर्व सामने क्रिकेटप्रेमींना पाहता येणार आहेत. तर, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स-२ या चॅनेलवर पाहता येईल.

हिंदुस्थानी महिला संभाव्य संघ –

गोंगडी तृषा, निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), आयुषी शुक्ला, भाविका अहिरे, ईश्वरी अवसरे, व्हिझे जोशिस्ता, जी. कमलिनी, धृती केसरी, अनादिता किशोर, मिताली विनोद, पारुनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा, शविनाम शर्मा, सोविना शर्मा.

हिंदुस्थानचे सामने –

19 जानेवारी हिंदुस्थान विरुद्ध वेस्ट इंडिज (सकाळी 8)
21 जानेवारी: हिंदुस्थान विरुद्ध मलेशिया (दुपारी 12
23 जानेवारी हिंदुस्थान विरुद्ध श्रीलंका (दुपारी 12)