चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड हिंदुस्थान-पाक द्वंद्व दुबईतच

अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वाद मिटले. आता ही स्पर्धा अपेक्षेप्रमाणे हायब्रिड मॉडेलनुसारच खेळविली जाणार असून हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना दुबईतच खेळविला जाणार आहे.

हिंदुस्थानचे सर्व साखळी सामने दुबईतच खेळविले जाणार असून हिंदुस्थानी संघाने बाद फेरी गाठली तरच उपांत्य आणि अंतिम सामना दुबईत खेळविले जातील. जर हिंदुस्थान साखळीतच बाद झाला तर हे सामने लाहोर आणि रावळपिंडीला खेळविले जाणार आहेत. पाकिस्तानने हायब्रिड मॉडेलला मान्यता दिल्यामुळे 2027 पर्यंत हे मॉडेल कायम असेल. याचाच अर्थ आता पाकिस्तानही हिंदुस्थानात खेळणार नाही. 2026 मध्ये टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबोत खेळविले जातील. तसेच आता पाकिस्तानी क्रिकेट मंडळाला कोणतीही भरपाई मिळणार नाही. लवकरच आयसीसी या स्पर्धेच्या हायब्रिड मॉडेलची अधिकृत घोषणा करून स्पर्धेचा रखडलेला कार्यक्रमही जाहीर करतील.