ICC Champions Trophy 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे रंगणार हिंदुस्थान-पाकिस्तान सामना? वाचा सविस्तर…

चॅम्पियन्स ट्रॉफीचे बिगूल वाजले असून 19 फेब्रुवारीपासून चौफेर फटकेबाजीला सुरुवात होणार आहे. ICC ने संपूर्ण वेळापत्रक जाहीर करत चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला आहे. स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवण्यात येणार असून टीम इंडियाचे सर्व सामने UAE मध्ये खेळवण्यात येणार आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघांचा समावेश असून दोन गटांमध्ये संघांची विभागणी करण्यात आली आहे. संपूर्ण स्पर्धेत 15 सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच हिंदुस्थानचा समावेश अ गटात करण्यात आलेला आहे. अ गटामध्ये हिंदुस्थान, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश या देशांचा समावेश आहे. तर ब गटामध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड या देशांचा समावेश आहे. टीम इंडियाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 19 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि 2 मार्च ला न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा सामना होईल.

चॅम्पियन्स ट्रॉफी रणसंग्राम 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या दरम्यान रंगणार आहे. पहिली सेमीफायनल 4 मार्च रोजी दुबईमध्ये आणि दुसरी सेमीफायनल 5 मार्च रोजी लाहोरमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच फायनल सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तर फायनलचा सामना 9 मार्च रोजी दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. जर टीम इंडिया फायनलमध्ये पोहचण्यास असमर्थ ठरली, तर फायनल लाहोरमध्ये खेळवण्यात येईल. तसेच फायलन सामन्यासाठी 10 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक

19 फेब्रुवारी – पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंड, कराची
20 फेब्रुवारी – हिंदुस्थानविरुद्ध बांगलादेश , दुबई
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड, लाहोर
23 फेब्रुवारी – हिंदुस्थानविरुद्ध पाकिस्तान, दुबई
24 फेब्रुवारी – बांगलादेशविरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तानविरुद्ध इंग्लंड, लाहोर
27 फेब्रुवारी – पाकिस्तानविरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर
1 मार्च – दक्षिण आफ्रिकाविरुद्ध इंग्लंड, कराची
2 मार्च – हिंदुस्थानविरुद्ध न्यूझीलंड, दुबई