
सध्या टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचा सिलसिला सुरू असून आता प्रसिद्ध टेक कंपनी आयबीएम जवळपास नऊ हजार कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकणार आहे. ही कंपनी अमेरिकेतील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना डच्चू देणार आहे. आयबीएमच्या क्लाऊड क्लासिक विभागातून कर्मचाऱ्यांना काढण्यात येणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क सिटी, स्टेट टेक्सास, डलास, रॅले, नॉर्थ कॅरोलिनामधील हजारो कर्मचाऱयांच्या नोकरीवर गंडांतर येणार आहे. या कर्मचारी कपातीमध्ये कन्सल्टेंट, कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी इनिशिएटीव, क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर, सेल्स आणि आयबीएमचे चीफ इन्फोर्मेशन ऑफिसर पदांच्या नोकऱ्याही धोक्यात आहेत. हिंदुस्थानातील बंगळुरू, पुणे, चेन्नई आणि हैदराबाद यांसारख्या शहरांत आयबीएमची कार्यालये आहेत.