
राज्यभरात चर्चेत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग व बहुविकलांग अशी प्रमाणपत्रे देण्यात आली होती. तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली प्रमाणपत्रे अधिकृत आहेत की नाही, याचा कागदोपत्री अहवाल तयार करण्याचे काम जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. हा अहवाल आज सरकारकडे सादर केला जाणार आहे.
या प्रमाणपत्रांबाबत नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बैठक घेतली.
2018 मध्ये खेडकर यांना प्रमाणपत्र देणारे तत्कालीन प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक बापूसाहेब गाढे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दर्शना धोंडे यांच्यासह सध्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याशी चर्चा केली.
पूजा खेडकर यांचे गाव भालगाव (ता. पाथर्डी) हे आहे. खेडकर यांना नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग व बहुविकलांग अशी दोन प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र 25 एप्रिल 2018 ला तर मानसिक (बहुविकलांग) व नेत्र दिव्यांग खेडकर यांना ज्या कालावधीत दिव्यांग प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली, त्या कालावधीत असलेल्या तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लेखी म्हणणे घेण्याचे काम सुरू आहे. दिलेली प्रमाणपत्रे हे त्यांनी दिलेली आहेत की नाही, याबाबतही बैठकीत चर्चा झाली आहे. या अधिकाऱ्यांकडून आलेला लेखी अहवाल जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे सादर केला जाणार आहे, असे डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले.
रुग्णालयातील रेकॉर्ड रूम व कागदपत्रे सील करण्याची मागणी केली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडून राज्य सरकारने खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रप्रकरणी अहवाल मागवला आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी देखील या प्रकरणाची चोकशी सुरू केली असल्याचे सांगण्यात आले आहे.