‘नकोशी’ ते आयएएस अधिकारी; संजित महापात्रा यांचा प्रेरणादायी प्रवास…

मुलगी नको’ ही मानसिकता आजही समाजात आहे. अशीच मानसिकता असलेल्या पुटुंबात संजिता महापात्रा यांचा जन्म झाला. गरीब पुटुंबाला संजिता नकोशी होती. एकवेळ तर अशी आली की तिला सोडून देण्याचा निर्णय पुटुंबीयांनी घेतला होता. पण संजिताच्या भविष्यात काहीतरी वेगळे लिहिलेले होते. सध्या अमरावतीच्या आयएएस अधिकारी असलेल्या संजिता महापात्रा यांची कथा प्रेरणादायी आहे.

संजिता महापात्रा यांचा जन्म ओडिशातील राऊरकेला येथील गरीब कुटुंबात झाला. संजिताच्या जन्माने घरात पुणी आनंदी नव्हतं. कुटुंबाने जवळजवळ त्यांना सोडून दिलं होतं. केवळ बहिणीच्या आग्रहामुळे संजिता घरात राहू शकली. परिस्थिती बेताची असल्याने अनेक संघर्षांना तिला तोंड द्यावे लागले. सामाजिक संस्था, शिक्षक आणि संस्थांच्या मदतीने तिने आपले शिक्षण पूर्ण केले.

संजिताने लहानपणी आयएएस अधिकारी व्हायचे स्वप्न पाहिले होते. पतीच्या पाठिंब्यामुळे ती आपले स्वप्न पूर्ण करू शकली. 2019 मध्ये संजिताने पाचव्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली.