
हिंदुस्थानी हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान बुधवारी रात्री गुजरातच्या जामनगर येथे कोसळले. सरावादरम्यान हे विमान सुवरडा गावातील बाहेरच्या परिसरात कोसळले. या दुर्घटनेमध्ये हरयाणाच्या रेवाडी येथील 28 वर्षीय पायलट फ्लाईट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव हे ठार झाले.
काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ यादव यांचा साखरपुडा झाला होता. लग्नाची तारीखही निश्चित झाली होती. घरी लग्नाची तयारी सुरू असतानाच मुलगा विमान अपघातामध्ये शहीद झाल्याचे वृत्त आले आणि यादव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. लग्नघरावर शोककळा पसरली.
चौथी पिढी देशसेवेत
फ्लाईट लेफ्टनंतर सिद्धार्थ यादव यांच्या कुटुंबाचाही लष्करी सेवेचा इतिहास आहे. यादव कुटुंबाची चौथी पिढी लष्करी सेवेत कार्यरत होती. सिद्धार्थ यांचे वडील वायुसेनेमध्ये होते, तर आजोबा निमलष्करी दलात आणि पणजोबा ब्रिटीश राजवटीमध्ये बंगाल इंजिनिअर्समध्ये सेवा बजावत होते.
2016 मध्ये एनडीए परीक्षा उत्तीर्ण
सिद्धार्थ यादव 2016 मध्ये एनडीए परीक्षा उत्तीर्ण झाले होते. तीन वर्ष कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर सिद्धार्थ फायटर पायलट बनले होते. दोन वर्षाच्या सेवेनंतर त्यांना फ्लाईट लेफ्टनंट पदावर बढतीही मिळाली होती.
10 दिवसांपूर्वी साखरपुडा, 2 नोव्हेंबरला लग्न
विमान अपघाताच्या 10 दिवस आधी सिद्धार्थ यादव यांचा साखरपुडा झाला होता. 23 मार्चला साखरपुडा झाला आणि लग्नासाठी 2 नोव्हेंबर ती तारीख निश्चित करण्यात आली होती. साखरपुड्यासाठी सुट्टी काढलेले सिद्धार्थ हे 31 मार्च रोजी ड्यूटीवर परतले होते. मात्र त्यानंतर 3 एप्रिल रोजी गुजरातमध्ये झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
एकुलता एक मुलगा गेला याचे दु:ख, पण…
सिद्धार्थ यांचे वडील सुजित यादव यांनी मुलाच्या अपघाती निधनावर शोक व्यक्त केला. लहानपणापासून त्याने विमानाने उड्डाण करण्याचे आणि देशसेवा करण्याचे स्वप्न पाहिले होते. तो एक हुशार विद्यार्थी होता. आम्हाला त्याचा अभिमान आहे. माझे वडील, आजोबाही सैन्यात होते. मी देखील हवाई दलामध्ये होते. एकुलता एक मुल मुलगा गेल्याचे दु:ख आहे, पण एक वाचवताना त्याने आपला जीव गमावला याचा अभिमान आहे, असे ते म्हणाले.
जामनगर के पास वायुसेना के विमान हादसे में रेवाड़ी के गांव माजरा (भालखी) के लाल जगुआर पायलट सिद्धार्थ यादव जी की शहादत को मैं नमन करता हूँ। हरियाणा की बलिदानी धरती के लाल का यह बलिदान सदैव याद रखा जाएगा।
दुःख की इस घड़ी में हम सभी शहीद के परिवार के साथ पूरी संवेदनशीलता के साथ… pic.twitter.com/EqjoTECPtm
— Nayab Saini (@NayabSainiBJP) April 3, 2025
विमानात तांत्रिक बिघाड
हवाई दलाच्या दोन आसनी जग्वार लढाऊ विमानाने बुधवारी रात्री जानगर एअरफिल्डवरून उड्डाण केले होते. यानंतर विमानामध्ये तांत्रित बिघाड झाला. एअरफिल्ड आणि नागरिकांच्या जीवाचे नुकसान होऊ नये म्हणून सिद्धार्थने हे विमान निर्जन स्थळी नेले आणि सह-वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडेल याची खात्री केली, असेही त्याच्या वडिलांनी सांगितले. दरम्यान, सिद्धार्थ यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी रेवाडी येथे पोहोचणार असून त्याच्या मूळ गावी भालकी-माजरा येथे त्यांच्यावर लष्करी इतमामान अंत्यसंस्कार केले जातील.