
हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे गुजरातच्या जामनगरमध्ये सोमवारी आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये एकूण किती लोक होते याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र यात कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रेमसुख देलू यांनी दिली.
जामनगर हवाई दलाच्या स्थानकापासून सुमारे 22 किमी अंतरावर असलेल्या रंगमती धरणाजवळील चांगा गावाबाहेर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. रंगमती धरणाजवळ हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले, असे देलू यांनी सांगितले.