मी दहशतवाद्यांप्रमाणे पिंजऱ्यात बंद, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानचा आरोप

Imran-Khan

मला दहशतवाद्यांप्रमाणे पिंजऱ्यात कैद करण्यात आले असून केवळ 7 ते 8 फुटांच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. या तुरुंगाची उंची 6 फूट आणि 2 इंच आहे. यामुळे मला हालचाल करणेसुद्धा कठीण जात आहे, असा आरोप पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. मी नेहमीच एजन्सींच्या निगराणीखाली असतो. माझे 24 तास निरीक्षण केले जाते. मला कुणाला भेटण्याचीही परवानगी नाही, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या भवितव्याबद्दल दररोज योजना आखतात. पाकिस्तानची वाईट स्थिती असताना लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. एक दिवस न्याय अत्याचारावर विजय मिळवेल. इम्रान यांना तुरुंगात व्यायामाची सायकल, वार्ंकग गॅलरी आणि स्वयंपाकघर देण्यात आले आहे. त्यांना खाण्यासाठी अप्रतिम मेनू दिला जात आहे, असे पाकिस्तानचे अताउल्ला तरार यांनी सांगितले. इम्रान खान यांच्यावर 100 हून अधिक खटले प्रलंबित आहेत.