Pahalgam Terror Attack- मी कलमा म्हणू शकलो, म्हणून मी वाचलो! प्राध्यापकाची मृत्युच्या दाढेतून सुटका

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. आसाम विद्यापीठाचे प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य पहलगामजवळील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावले. प्राध्यापकांनी त्यांचे प्राण या दहशतवादी हल्ल्यात कसे वाचले यावर त्यांनी आपबिती सांगितली. दहशतवाद्यांनी पहलगामजवळील बैसरनमध्ये हल्ला केला. प्राध्यापक भट्टाचार्य देखील त्यांच्या कुटुंबासह त्याठिकाणी होते.

Pahalgam Terror Attack- आता कश्मीर टूर नको! पैसे वाया गेले तरी चालतील.. कश्मीर सहलीचे बुकिंग रद्द करण्यासाठी पर्यटक सरसावले

प्राध्यापक भट्टाचार्य यांनी यासंदर्भातील भयावह अनुभव सांगितला. ते म्हणाले की, ते त्यांच्या कुटुंबासह एका झाडाखाली झोपले होते. मग त्यांना आजूबाजूची लोक कलमा म्हणताना आढळले. काहीही विचार न करता त्यांनीही कलमाचे पठण सुरु केले.  ते पुढे म्हणाले की, त्यानंतर एक दहशतवादी आला, त्याने लष्करी कपडे घातले होते. त्याच्यांकडे येताच दहशतवाद्याने त्याच्या शेजारील माणसावर गोळी झाडली. मग दहशतवाद्याने भट्टाचार्यकडे पाहिले आणि विचारले की तुम्ही काय करत आहात? हे विचारताच भट्टाचार्य यांनी कलमाचे पठण अधिक जोरात करायला सुरुवात केली. तसा तो दहशतवादी लगेच निघून गेला. सध्या या प्राध्यापकांना ते जिवंत आहे यावरच विश्वास बसत नाहीये.

Pahalgam Terror Attack- आई मी कश्मीरवरुन आल्यावर तुला भेटायला येईन, नीरजचं ते अखेरचं बोलणं ठरलं…

दहशतवादी गेल्यानंतर लगेचच प्राध्यापकांनी संधीचा फायदा घेतला आणि पत्नी आणि मुलासह तेथून पळून गेले. पळून जाताना घोड्याच्या खुरांच्या खुणेवरुन ते आणि त्यांचे कुटुंब पुढे चालत राहिले. अखेर दोन तासानंतर त्यांना दुसरा माणुस दिसला. त्यानंतर भट्टाचार्य आणि कुटुंबीय हॉटेलवर परत पोहोचण्यात यशस्वी झाले.