i Phone -16 लॉन्च होणार? Apple च्या इव्हेंटमध्ये उठणार पडदा

अ‍ॅपलचा आज एक इव्हेंट होणार आहे. आज अ‍ॅपल कंपनी बहुचर्चित आयफोन 16 सिरीज लॉन्च करणार का हे कळणार आहे. यासोबतच कंपनी Apple Airpods, Apple Watch सुद्धा लॉन्च करण्याची शक्यता आहे.

भारतीय वेळेनुसार रात्री साडे दहा वाजता हा इव्हेंट होणार आहे. युट्युब, अ‍ॅपल टीव्ही वर या इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

iPhone 16 आणि iPhone 16 Pro सिरीज

अ‍ॅपल आपल्या इव्हेंटमध्ये आयफोन 16 सिरीज लॉन्च करेल असे सांगण्यात येत आहे. त्यात आयफोन 16, आयफोन 16 प्रो, आयफोन 16 मॅक्स लॉन्च होईल. या वेळेला आयफोनमध्ये काही डिजाईन बदलले असतील आणि कॅमेराही बदलेला असेल.

Apple Watch ची भेट

अ‍ॅपलच्या या इव्हेंटमध्ये Apple Watch 10 ही लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्यात मोठी स्क्रीन, स्लीम डिझाईन आणि आणखी चांगली बॅटरी ड्युरॅबिलिटीही असणार आहे. इतकंच नाही तर या वॉचमध्ये हेल्थ फीचर्सचाही समावेश करण्यात येणार आहे.

iOS 18 ची सुरूवात?
अ‍ॅपलच्या आजच्या इव्हेंटमध्ये iOS 18 ची घोषणा होऊ शकते. त्यासोबत iPadOS 18, watchOS 11 आणि tvOS 18 वरही नवीन अपडेट मिळू शकते.